महापौर आपल्या प्रभागात उपक्रम : नागरिकांनी वाचला महापौरांसमोर समस्यांचा पाढा
स्थानिक बातम्या

महापौर आपल्या प्रभागात उपक्रम : नागरिकांनी वाचला महापौरांसमोर समस्यांचा पाढा

Abhay Puntambekar

नवीन नाशिक । प्रतिनिधी

प्रभाग क्र. २८. मध्ये महापौर सतीश कुलकर्णी यांनी पाहणी दौरा करून विविध समस्या सोडवण्यांबाबत अधिकार्‍यांना सूचना केल्या.
यावेळी नवीन नाशिक प्रभाग सभापती दीपक दातीर, नगरसेवक दत्तात्रय सूर्यवंशी, नगरसेविका सुवर्णा मटाले, प्रतिभा पवार आदी उपस्थित होते.

या प्रसंगी नागरिकांनी विविध प्रश्न मांडले त्यात लाईट, पाणी, ड्रेनेज यासारख्या विषयांवर लक्ष देऊन सुविधा पुरवाव्यात, झाडांच्या फांद्या कमी करणे, शुभम पार्क येथे पोलीस चौकी करावी, रस्त्यावर गतिरोधक टाकावे, उद्यानाचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, मंदिराचा हॉल गळत असून त्याची गळती बंद करावी,परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास असून त्यावर नियोजन करावे, गजानन नगर परिसरात स्वच्छता होत नाही स्वच्छता ठराविक भागातच केली जाते, रस्त्यावर कचरा पडत असतो त्यादृष्टीने उपाययोजना करावी, परिसरासाठी पोलिसांची गस्त वाढवावी, बर्‍याच वेळा पथदीप बंद असतात ते सुरू करावेत, उमा पार्क व धनलक्ष्मी परिसरात रस्ता करावा,येथील पथदिप बंद असतात ते सुरू करावेत,

त्रिमूर्ती चौक पाथर्डी एमआयडीसी रस्त्यावर सिग्नल करावा, परिसरात अतिक्रमण वाढले आहे त्यामुळे अपघात वाढतात ते अतिक्रमण काढण्यात यावे. मोकळ्य ाभूखंडावर कचरा साचून असतो त्यामुळे दुर्गंधी पसरते उद्यानात खेळणी बसवून संरक्षण भिंत बांधावी, एमआयजी योजना येथे भुयारी गटारीचा प्रश्न असून तो सोडवावा, अतिक्रमण वाढले असून त्यामुळे गटार दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होतो त्यावर उपाय योजना करावी, जनार्दन स्वामी नगर येथे वीज वितरण कंपनीचे मिनी पिलर बसण्याची व्यवस्था करावी, माधव रोहाऊस परिसरात पक्के रस्ते करावे, त्या ठिकाणी असणार्‍या गंगा रो हाऊस येथील विद्युत तारांवर झाडांच्या फांद्या आल्या आहेत त्या कमी कराव्यात अन्यथा मोठा अपघात घडू शकतो याबाबत दक्षता घ्यावी.

सातपूर व अंबड एमआयडीसी रस्त्यावर गतिरोधक बसवावे तसेच उपेंद्र नगर भागात असणार्‍या विद्युत वाहिन्या भूमिगत कराव्यात, गजरा पार्क येथे पाण्याची बिले वेळेवर मिळत नाहीत ती देण्याची व्यवस्था करावी , औषधांची फवारणी करावी कॉलनी परिसरात ठीक ठिकाणी फलक लावावेत आदी विविध प्रश्न सतीश नादुर्डे, सुरेश पाटील, जिभाऊ सरोदे, साळवे, पुनम चौधरी, महेंद्र राहाडे, मकरंद वाघ, सुभाष अहिरराव, उमेश धामणे यांनी मांडले.

यावेळी विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, उपअभियंता एस.एस.रौंदळ, संजय गांगुर्डे, नदीम पठाण, नितीन पाटील, गोकुळ पगारे, प्रवीण थोरात आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com