मालेगाव : अज्ञाताच्या गोळीबारात एक महिला ठार
स्थानिक बातम्या

मालेगाव : अज्ञाताच्या गोळीबारात एक महिला ठार

Abhay Puntambekar

मालेगाव | प्रतिनिधी 

मालेगाव शहरात पुन्हा गुंडांनी पुन्हा डोके वर काढले असून काही दिवसा पूर्वी एका नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना ताजी असतांना आज गोळीबाराने पुन्हा मालेगाव शहर हादरले आहे .

शहरातील भायगाव शिवारातील संविधान नगरमध्ये आज दुपारी अज्ञाताने घरात घुसून एका महिलेवर थेट गोळीबार केला त्यात ज्योती भटू डोंगरे ही महिला जागीच ठार झाली.गोळीबार केल्यानंतर मारेकरी फरार झाला.घटनेची माहिती मिळताचअप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक शशिकांत शिंदे यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

महिलेवर गोळीबार का करण्यात आला याचा पोलीस तपास करीत आहे.१५ दिवसात दिवसा ढवळ्या गोळीबाराच्या २ घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडून भीती पसरली आहे

Deshdoot
www.deshdoot.com