Saturday, April 27, 2024
Homeनाशिकउद्या मुंबईत इंटकचे राज्यस्तरीय संमेलन

उद्या मुंबईत इंटकचे राज्यस्तरीय संमेलन

महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांची माहिती

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

केंद्र सरकारच्या कामगारांविरोधी धोरणामुळे कामगार चळवळीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असून कामगारांच्या अनेक समस्या, कामगार कायद्यामध्ये कामगार विरोधी बदल, कंत्राटीकरण पद्धत, खासगीकरण व बेरोजगारीचा प्रश्न या पार्श्वभूमीवर कामगारांच्या भविष्यासाठी तसेच न्याय हक्कासाठी पुढील धोरण निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) महाराष्ट्र राज्याचे राज्यस्तरीय संमेलन इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, मंत्रालयासमोर मुंबई येथे मंगळवारी(दि.२५) आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिली.

केंद्र सरकारची धोरणे मालक धार्जिणे झालेली असताना कामगार चळवळी पुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. महाराष्ट्र इंटकच्या राज्यस्तरीय संमेलनात कामगार एकजुटीसाठी व कामगारविरोधी धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी एल्गार पुकारण्यात येणार असून आगामी काळात कामगार चळवळीचे नेतृत्व अधिक गतिशील करण्यासाठी कार्यक्षम कार्यकत्यांची फौज उभी करण्यात येणार आहे.

आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटित व आणि संघर्ष करा, हाच मूलमंत्र घेऊन पुढे जाण्याचा निर्णय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेने घेतलेला असून त्याकरिता पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. संमेलनास राज्यभरातून महाराष्ट्र इंटकला संलग्न असलेल्या संघटनांचे १५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचेही छाजेड यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या