पायाभुत सुविधा नसतानाही विद्यापीठात एचपीटी अ‍ॅण्ड आरवायके सरस
स्थानिक बातम्या

पायाभुत सुविधा नसतानाही विद्यापीठात एचपीटी अ‍ॅण्ड आरवायके सरस

Abhay Puntambekar

एचपीटी अ‍ॅण्ड आरवायके महाविद्यालय ‘बेस्ट कॉलेज अवार्ड’ने सन्मानित

नाशिक । प्रतिनिधी

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्टस् अँड आरवायके सायन्स महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘बेस्ट कॉलेज अवॉर्ड’ (सर्वोत्कृष्ट महाविद्यालय) नुकताच प्रदान करण्यात आला. पायाभुत सुविधा नसतानाही महाविद्यालयाने पुरस्कार मिळवला आहे. महाविद्यालय जरी शहरातील वर्दळीच्या आणि हायप्रोफाईल अशा कॉलेज रोडवर असले तरी ५१ टक्के पेक्षा अधिक मुलं ही ग्रामीण भागातील शिक्षण घेत असल्याची माहिती प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी यांनी दिली. ते पत्रकारीता विभागात माध्यमप्रतिनिधींशी बोलत होते.

ते म्हणाले,महाविद्यायात उत्तम ग्रंथालय आहे स्पर्धापरिक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बैठकव्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामूळे स्पर्धा परीक्षेकडेदेखील या विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थी सायबर जनजागृती करत आहेत. लहान वयात मोबाईलचा काळजीपुर्वक वापर कसा करावा याबाबत शिबिरं घेतली जात आहेत. शिबिरांच्या माध्यमातून ३० ते ५० शाळांतील ३० ते ३२ हजार विद्यार्थ्यांना सायबर जनजागृतीचे धडे दिले आहेत.

महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे दिले जात आहेत. मशरुम शेतीचे ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जात आहे. स्पोर्ट्मध्येही आमचे खेळाडू मागे नसल्याचे प्राचार्य सुर्यवंशी म्हणाले. अ‍ॅथलेटीक्स खेळाडू दुर्गा देवरे हिने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केली आहे. अखिल भारतीय विद्यापीठ स्तरावर महाविद्यालयातील १२ विद्यार्थ्यांनी देदिप्यमान कामगिरी केली आहे. तलवारबाजीत ऋत्वीक शिंदे, हॉलीबॉलमध्ये प्रियांका पगारे व खेलो इंडियात स्पधेत अपुर्व रोकडे यांच्यासह दोघा विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरीचा ठसा उमटवला आहे. बॅडमिंटनमध्ये प्रज्ञा गद्रे हिने उत्तम कामगिरी बजावली आहे.

येणार्‍या काळात महाविद्यालयात संशोधनावर भर दिला जाणार आहे. तसेच जास्तीत जास्त प्राध्यापक पीएचडी धारक असावेत यावर भर असेल. १९८५ पासून जर्मन आणि फ्रेंच भाषेचे कोर्स सुरु आहेत. स्पॅनिश भाषेचा कोर्स सुरु करण्याचा मानस आहे. इतर राज्यातील भाषा विद्यार्थ्यांना आल्या पाहिजेत यासाठी लवकरच डिप्लोमा कोर्स सुरु करण्याचा मानस आहे. तसेच अनेक संशोधनाकडे वळावेत यासाठी प्रयत्न केले जातील. सिंथेटीक ट्रॅक तयार केला जाणार आहे. बॅडमिंटनसाठी सुसज्ज हॉल तयार करणार आहोत. खो-खो साठी ग्राउंड तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षक व विद्यार्थी जपतायेत सामाजिक भान
आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या हेतूने शिक्षकांसह विद्यार्थी सामाजिक बांधीलकी जपत आहेत. अनेक शिक्षक मिळणार्‍या पगारातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आहेत. महाविद्यालयातील मुलं सौरदिवे बनविण्याचे काम करतात. या दिव्यांचा वापर नाशिकमधील अतिदुर्गम भागात जिथे विज अद्याप पोहोचली नाही. किंवा रात्रीच्या वेळी याठिकाणी लोडशेडींग असते तिथे या दिव्यांचे वितरण होणार आहे.

कमवा आणि शिका’योजनेतून भिंती चकाचक
महाविद्यालयात सुरु असलेल्या कमवा आणि शिका योजनेत बहुतांश ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे यात उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. हे विद्यार्थी वारली पेंटींग काढून महाविद्यालयाचा कायापालट करत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com