वन्यजीवांना वाचविण्यासाठी हायटेक ‘एफएआरटी‘
स्थानिक बातम्या

वन्यजीवांना वाचविण्यासाठी हायटेक ‘एफएआरटी‘

Abhay Puntambekar

६० लाखांचा निधी उपलब्ध; स्वतंत्र कार्यालयासह रेस्क्यू व्हॅनही मिळंणार

नाशिक । प्रतिनिधी

वन्यजीव रेस्क्यू करण्यापासून त्यांच्यावर औषधोपचार करण्यापर्यंत लागणारी अत्यावश्यक हायटेक साधनसामुग्रीची खरेदी वनविभागाने सुरूकेली आहे. त्यापैकी बहुतांश साहित्य उपलब्ध असून शहरातील वनविभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयात स्वतंत्ररित्या फॉरेस्ट अ‍ॅडव्हान्स रेस्क्यू टीमचे ( एफएआरटी) कार्यालयदेखील सुरू करण्यात आले आहे. या पथकात २५ प्रशिक्षित वनरक्षकांचा समावेश करण्यात आला असून पथकाचे नियंत्रण फिरत्या दक्षता पथकाच्या वनक्षेत्रपालांकडे देण्यात आले आहे.

वन्यजीवांवर उपचार करण्यासाठी २ विशेष पिंजरे, १ आधुनिक ट्रॅन्क्युलाईज गन, शवविच्छेदनासाठी लागणारे २ अद्ययावत टेबल, ४ ब्लो पाईप, जेरबंद करण्यासाठी लागणारे ५ नवीन पिंजरे, शवविच्छेदनासाठी लागणारे पशुवैद्यकिय कीटचे २ सेट, ३ अ‍ॅल्युमिनियम शिडी, ४ दोरखंडाच्या शिडडी, २ दोरखंडाची जाळी, १ टेलिस्कोप, फायबरच्या २० संरक्षक ढाली, २५ विशेष गणवेश, रेस्क्यू करण्यासाठी ट्रॅन्क्युलाईज करणार्‍या वनरक्षकांकरिता ६ विशेष सुरक्षा सूट, ४ दुर्बीणी, १० एलईडी टॉर्च, ८ हेड लॅम्प, २० हेल्मेट, ७ कॅमेरा ट्रॅप, ध्वनिक्षेपक, मेगाफोन स्पीकर पोर्टेबल,१२ प्रथमोपचार पेटी, १ डिजीटल वजन काटा, प्रत्येकी एक पोर्टेबल इन्व्हर्टर/जनित्र, लोखंडी बाज, अशी महत्त्वाची साहित्यसामुग्री लवकरच उपलब्ध होणार आहे. या टीमसाठी एकूण ६० लाखांचा निधी उपलब्ध असून याव्यतिरिक्त स्वंतत्ररित्या अद्ययावत रेस्क्यू व्हॅन लवकरच मिळणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com