Friday, April 26, 2024
Homeनाशिकनासिक्लब गुलाब पुष्प प्रदर्शनास नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद

नासिक्लब गुलाब पुष्प प्रदर्शनास नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद

नासिक | प्रतिनिधी

देशभरातून विविध रंग व प्रकारातील गुलाब पुष्प व विविध  प्रकारचे ३० पेक्षा अधिक प्रकारची फुलझाडे नासिक्लब गुलाब पुष्प प्रदर्शन २०२० मध्ये पाहण्यास रसिक नाशिककरांनी आज चांगली गर्दी केली होती. या गुलाब पुष्प महोत्सवाचे उदघाटन प्रसिद्ध उद्योजक मा.देवकिसनजी सारडा यांचे शुभ हस्ते करण्यात आले. उद्घटनास ब्रिगेडिअर अनिलकुमार गर्ग, अभनेते डॉ. राजेश आहेर, नाना शेवाळे , नेमीचंद पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

पुष्प प्रेमी नाशिककर गुलाबपुष्पाने सजवलेल्या “रोज डॉल” , पुष्पाने सजवलेली मलेशियन पोपटांची जोडी व कल्पकतेने बनवलेल्या क्रिसमस ट्री या बरोबर देखील सेल्फीचा आनंद घेत आहेत. प्रदर्शनास विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट देऊन फुलां विषयी माहिती जाणून घेतली. गुलाब पुष्प प्रदर्शन २४ ते २६ जानेवारी २०२० , वेळ सकाळी ९ ते सायं ६.असणार आहे.

यावर्षी वैशिष्ट्य म्हणजे नाशिक तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी देखील गुलाब प्रदर्शनात भेट देऊन शेती संबंधी काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला . यातून शेतकऱ्यांचा कल नवीन पारंपारिक शेती पासून काही नवीन करण्याकडे आहे हे जाणवले.

- Advertisment -

ताज्या बातम्या