अर्थव्यवस्था सुधारण्याची सरकारलाच आशा नाही : चिदंबरम
स्थानिक बातम्या

अर्थव्यवस्था सुधारण्याची सरकारलाच आशा नाही : चिदंबरम

Abhay Puntambekar

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची आशाच सोडली असल्याचं सिद्ध होतंय, असा दावा पी. चिदंबरम यांनी केला आहे.

चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली. मी पहिल्यांदाच सर्वात मोठं बजेट भाषण ऐकलं, असा चिमटा काढताना हे भाषण १६० मिनिटाचं होतं. या भाषणातून २०२०-२०२१ साठी काय संदेश द्यायचा होता, हे मला कळलं नाही. या भाषणात मला कोणताही अविस्मरणीय विचार किंवा घोषणाही दिसली नाही, अशी टीका चिदंबरम यांनी केली.

Deshdoot
www.deshdoot.com