Thursday, April 25, 2024
Homeनाशिकस्ट्राय स्टीमर मशिनद्वारे होतेय गोदावरीची स्वच्छता

स्ट्राय स्टीमर मशिनद्वारे होतेय गोदावरीची स्वच्छता

स्मार्ट सिटी कंपनीकडून २.६१ कोटींच्या मशिनची खरेदी

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

दक्षिण गंगा म्हणुन जगभरात ओळख असलेल्या गोदावरी नदीची प्रदुषणाचा प्रश्न अद्याप संपलेला नसुन महापालिकेकडुन सुरू असलेल्या उपाय योजनानंतर आता स्मार्ट सिटी कंपनीकडुन गोदावरी नदी स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. याकरिता स्मार्ट सिटीकडुन २.६१ कोटी रु. किंमतीचे स्ट्राय स्टीमर मशिन खरेदी करण्यात आले असुन गेल्या सात आठ दिवसापासुन नदीच्या पाण्यावर आलेले शेवाळ काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रारंभी सीआरएस अंतर्गत जिंदल कंपनीकडुन काही दिवसासाठी हे मशिन आनंदवल्ली ते रामवाडी या दरम्यान नदी स्वच्छतेसाठी वापरण्यात आले होते. क्लीनटेक कंपनीकडुन हे मशिन ५ वर्ष ऑपरेटींग व मेंटनेस या तत्वावर खरेदी करण्यात आले आहे. गेल्या सात आठ दिवसापासुन मशिनद्वारे रामवाडी परिसरातील हिरवेगार दिसणारे पात्र आता स्वच्छ करण्यात आले आहे. महापालिकेकडुन गेल्या वर्षी आनंदवल्ली ते नांदूर पर्यत गोदावरी नदी स्वच्छतेचे कामांचा ठेका येत्या २९ फेब्रुवारी २०२० रोजी संपणार आहे. यामुळे आता स्मार्ट सिटीच्या मशिनद्यारे यापुढे नदी स्वच्छतेचे काम केले जाणार आहे.

महापालिकेकडुन नदीतील गाळ व कचरा काढण्यासाठी एक रोबोटीक मशिन खरेदी करण्यात आले आहे. आता महापालिकेकडुन गोदावरीच्या उपनद्या नंदीनी, वालदेवी व वाघाडी या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे. याकामासंदर्भात निवीदा प्रक्रिया राबविण्यात आली असुन कार्यादेश देण्यात आलेले नाही. महापालिकेकड १ रोबोटेक मशिन असल्याने उपनद्या स्वच्छतेच्या कामावर मर्यादा येत असल्याने आणखी २ रोबोटीक मशिन खरेदी करण्याचे आदेश अलिकडेच महापौरांनी दिले आहे. याकरिता पुढच्या बजेट मध्ये तरतुद झाल्यानंतर एकुण तीन रोबोटीक मशिनद्वारे उपनद्या स्वच्छ केल्या जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या