विकास कामांचा निधी वेळेत खर्च होणार- जि.प.अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर
स्थानिक बातम्या

विकास कामांचा निधी वेळेत खर्च होणार- जि.प.अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्हा परिषदेस जिल्हा नियोजन मंडळाकडून सन २०१९-२० या आर्थिक वर्षात मंजुर निधीतील विकास कामांच्या प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रिया पूर्ण करुन विकास कामे तात्काळ मार्गी लावण्याबाबत तसेच निधी खर्च करण्याबाबतचे निर्देश जिल्हा परिषद यंत्रणांना दिले आहेत. विकास कामांचा निधी वेळेत खर्च होईल,अशी माहिती जि.प.अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी दिली.

नाशिक जिल्हा परिषदेचा विविध विकास कामांचा निधी वेळेत खर्च करुन विकास कामे मार्गी लावण्याबाबत सूचना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ व कृषिमंत्री दादा भुसे यांनी जिल्यातील कार्यरत शासकीय यंत्रणांना केल्या होत्या.त्यानुसार नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकासकामांचा व योजनांचा सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील निधी ३१, मार्च, २०२० अखेर खर्च करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.

नाशिक जिल्हा परिषदेस प्राप्त निधीतुन झालेल्या विकास कामांचे देयके पारीत करण्यात येत असून वैयक्तिक लाभांच्या योजनांचे निधी सुद्धा लाभार्थी खात्यावर जमा केला जात आहे. नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील विविध विकास कामांचा तथा वैयक्तिक लाभाच्या योजनांचा निधी खर्च सुद्धा होण्याबाबत प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार जिल्ह्यातील विविध विकास कामांचा निधी वेळेत खर्च करण्याबाबत सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या कार्यान्वित यंत्रणांना निधी खर्चाबाबत विभागनिहाय आढावा घेऊन सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा विविध विकास कामांचा निधी विहित वेळेत खर्च करण्याबाबत निर्देश दिले आहेत

तसेच नाशिक जिल्हा परिषदेस जिल्हा नियोजन मंडळाकडून सन २०१९-२० या आर्थिक वर्षात मंजुर निधीतील विकास कामांच्या प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता व निविदा प्रक्रिया पूर्ण करुन विकास कामे तात्काळ मार्गी लावण्याबाबत तसेच निधी खर्च करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश जिल्हा परिषद यंत्रणांना दिले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com