पेटीएम केवायसी अपडेट करण्याचे सांगून फसवणूक
स्थानिक बातम्या

पेटीएम केवायसी अपडेट करण्याचे सांगून फसवणूक

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी 

पेटीएम केवायसी अपडेट करुन देण्याच्या बहाण्याने पाठविलेल्या लिंकद्वारे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून अज्ञाताने शहरातील मनजित कौर दलजितसिंग सोहल (रा. इंदिरानगर) यांच्या पतीच्या बँक खात्यातून सुमारे ५० हजार रुपये परस्पर काढून गंडा घातल्याचा प्रकार घडला.

पेटीएम केवायसी अपडेट करण्यासाठी संशयितानेे मनजित यांना लिंक पाठवून एनी डेस्क हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर संशयिताने पेटीएमला संंलग्न असलेल्या बँकेच्या खात्यातून परस्पर ४९ हजार ९८० रुपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक बोरसे तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com