सातपूर औद्योगिक वसाहतीत कारखान्याला भीषण आग
स्थानिक बातम्या

सातपूर औद्योगिक वसाहतीत कारखान्याला भीषण आग

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी

सातपूर येथील कोरोगेटेड बॉक्स बनविणाऱ्या सी आर एन वूडन या कारखान्याला आज सायंकाळी अचानक आग लागली या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला उद्योग क्षेत्रात काही उद्योग आणि आपली उत्पादन प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार त्या कारखान्याला लागणारे वुडन बॉक्स बनवण्यासाठी सी आर एन उद्योगांनीही सुरू केला होता .

दुपारी साडेतीन वाजता कारखाना बंद करून सर्व कर्मचारी घरी निघाले होते मात्र साडेचार वाजता अचानक शेजारच्या कंपनीतून आग लागली तर निरोप आल्याने तातडीने धावपळ सुरू केली असल्याचे कंपनीचे मालक चंद्रकांत मेवाडा यांनी सांगितले या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून साधारण पन्नास ते साठ लाखाचे नुकसान झाले असल्याचा दावा मेवाडा यांनी यांनी केला आहे.

दरम्यान आगीचे वृत्त समजताच सातपूर अग्निशमन केंद्राची तीन बंब महिंद्रा, सिएट, बॉश या कारखान्याचे बंब तसेच मुख्यालयाचा एक बंब अखंडपणे आग विझवण्यासाठी प्रयत्नशील होते लाकडाचे साहित्य व त्याखाली असलेल्या भुसा त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी खूप त्रास होत होता भिजलेल्या पुन्हा उफाळून येत असल्याने रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.

घटनेचे वृत्त समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सूर्यवंशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे दुय्यम निरीक्षक नागरे आदीसह अधिकारी वर्ग यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला अडथळा ठरणारी गर्दीस हटवले.

Deshdoot
www.deshdoot.com