Thursday, April 25, 2024
Homeनाशिकद्वारका चौकात पुन्हा वाहतुकीत बदल

द्वारका चौकात पुन्हा वाहतुकीत बदल

नाशिक । प्रतिनिधी

द्वारका सर्कल चौकाच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा वाहतुकीत बदल करण्यात आला असून द्वारका सर्कलसह उड्डाणपूलावरून खाली उतरण्यासाठी ज्या जागा आहेत. या सर्व जागी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या अवजड ट्रक आणि बसेसला खाली उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच पुण्याकडून इतरत्र जाणारी वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहेत.

- Advertisement -

द्वारका चौक वाहतुक कोंडीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी उड्डाणपूलावरून अवजड वाहनांना खाली उतरण्याच्या जागा म्हणजे राष्ट्रीय महामार्गावरून के.के वाघ कॉलेज, द्वारका सर्कल,इंदिरानगर अंडरपास,स्प्लेंडर हॉल,गरवारे टी पॉईट या ठिकाणी चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी एन्ट्री पॉईंट आहेत.मात्र याचा वापर अवजड वाहनांना आणि बसेसला करता येणार नाही. त्या ऐवजी पुणे,संगमनेर सिन्नर कडून येणाजया वाहनांनी फेम टॉकिज सिग्नल येथून उजवी कडे वळून जेजूरकरमळा मिर्ची हॉटेल मार्गे औरंगाबाद रोड याप्रमाणे पंचवटी व अन्य ठिकाणी जाता येईल. त्यांना द्वारका चौकाकडे येण्यास बंदी आहे.

तसेच मुंबई बाजूकडे जाण्या येण्यासाठी फेम टॉकिज सिग्नल मार्गे डावी कडे वळून वडाळा पाथर्डी रोडने पाथर्डीगाव मार्गे मुंबईकडे जाता येईल. अवजड वाहनांना माल खाली करायचा असेल तर रात्री दहा ते सकाळी ८ यावेळेतच करावा लागेल. इतरवेळी शक्य असल्यास छोट्या वाहने वापरून संबधीत ठिकाणी वाहतूक करायची आहे. याबाबत काही तक्रारी आणि सुचना असल्यास व्यापारी, वाहनचालक व नागरीकांनी तीस दिवसाच्या आत पोलीसांकडे तक्रारी कराव्यात असेही आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या