Thursday, April 25, 2024
Homeनाशिकजिल्हा बँकेची मे महिन्यात निवडणुकीची शक्यता

जिल्हा बँकेची मे महिन्यात निवडणुकीची शक्यता

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू झाली असून निवडणुकीसाठी पात्र मतदारांची यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.या यादीनुसार निवडणूक प्रक्रीया पार पडणार आहे.जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक यांनी संस्था सभासदांचे ठराव मागणीबाबतचा कार्यक्रम बुधवारी (दि.18) जाहिरातीव्दारे प्रसिध्द केला.यात 16 जानेवारी 2020 पर्यंत संस्था सभासदांनी प्रतिनिधींचे ठराव पाठविण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

फेब्रुवारी 2020 अखेर मतदार यादी जाहीर होण्याची अंतिम तारीख असून मतदार यादी अंतिम झाल्यानंतर एप्रिल अथवा मे महिन्यात निवडणूक होईल,अशी शक्यता आहे.जिल्हा बँक निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्यामुळे सहकार क्षेत्रातील वातावरण तापण्यास प्रारंभ झाला आहे.जिल्हा बँकेचे संचालक मंडळ 21 इतके आहे.मे 2015 मध्ये बँकेची पंचवार्षिक निवडणुक झाली होती.
विद्यमान संचालकांची मुदत चार महिन्यांनी संपुष्टात येत आहे. त्या अनुषंगाने मतदारयाद्या तयार करण्याचे काम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हाती घेतले आहे.

बँकेच्या एकूण साडेनऊ हजार सोसायटया सभासद असून, त्यांचे प्रतिनिधी हे मतदार आहेत. निवडणुकीत प्रत्यक्ष सोसायटी नव्हे तर या सोसायटीने ठराव करून दिलेला प्रतिनिधीच मतदानाचा हक्क बजावतो. त्यानुसार जिल्हा निवडणुक अधिकारी यांनी बुधवारी (दि.18) संस्था सभासादांचे ठराव मागण्विण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमात 18 डिसेंबर 2019 ते 16जानेवारी 2020या कालावधीत संस्था प्रतिनिधींचे ठराव मागविण्यात आले आहेत.

सभासद संस्थांची प्राथमिक यादी ही 20 मे 2017 या तारखेवर निश्चित केली जाणार आहे. संस्था सभासदांचे ठराव पाठविण्याची कार्यपध्दती घोषीत केली असून, त्यानुसार जिल्हा उपनिंबध कार्यालया तथा जिल्हा निवडणुक अधिकारी कार्यालयाकडे 16 जानेवारी 2020 पर्यंत ठराव पाठविण्याचे आवाहन जिल्हा सहकारी निवडणुक अधिकारी यांनी केले आहे. ही यादी प्रसिध्द करून त्यावर हरकती मागविल्या जातील. हरकतींवर सुनावणी होऊन मग मतदारयाद्या अंतिम करण्यात येईल. या सार्‍या प्रक्रियेसाठी 90 दिवसांचा कालावधी लागणार आहे.

मतदारयादी अंतिम झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात येणार आहे. अंतिम मतदार यादी 25 फेब्रुवारी 2020 रोजी प्रसिध्द झाल्यानंतर साधारण 45 दिवसांनी म्हणजे एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणूक लागेल,अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या