Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकमधील गर्दी काही कमी होईना! एमजीरोडवर वाहतुकीचे तीनतेरा

नाशिकमधील गर्दी काही कमी होईना! एमजीरोडवर वाहतुकीचे तीनतेरा

नाशिक । प्रतिनिधी

शहरात करोनाचे संकट गडद होत असतानाच शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. अशातच करोनासाठी शासनाने दिलेल्या सामाजिक अंतराचे सर्व नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत. यामुळे हे करोना वाढीसाठी पोषक वातावरण ठरणार असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

शहरात करोनाचा वेगात प्रसार होऊन यामध्ये दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढत आहेत. असे असताना, दुसरीकडे मात्र शहराच्या मुख्य बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी वाढत आहे.

नाशिककरांनी शनिवार व रविवारी असे सुट्टीचे दिवस खरेदीसाठी कारणी लावले. ग्राहकांनी मुख्य बाजारपेठेत केलेल्या गर्दीमुळे करोनाचा फैलाव अतिवेगाने शहरात होऊन धोका वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

मालेगाव पाठोपाठ आता नाशिक शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. एका दिवसाला किमान ३० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडते आहे. यामुळे, शरातील करोनाग्रस्तांचा आकडा तीनशे वर गेला आहे. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सामाजिक अंतराचे, हातांची स्वच्छता आणि गर्दी टाळणे आवश्‍यक असताना, याउलट चित्र नाशिक शहराच्या मुख्य बाजारपेठत आहे. शालिमार, मेनरोड, रविवारी कारंजा, महात्मा गांधी रोड या परिसरामध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

तर यामुळे रविवारी मेनरोड, रविवार कारंजा, एम.जी. रोड आणि शालिमार तसेच शहरातील मुख्य मार्गांवर वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवली होती. रस्त्यालगत वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंगमुळे त्यात आणखीच भर पडत होती.

करोनासाठी काळजी घेण्याची गरज असताना ग्राहकांकडून सामाजिक अंतराचे अजिबात पालन केले जात नसल्याचे चित्र दिसत होते. बहुतांशी ग्राहकांनी तर मास्कचाही वापर केलेला नव्हता. तर, दुकानदारांकडून ठराविक अंतर ठेवून ग्राहकांशी व्यवहार केला जात असला तरी, दुकानासमोर केवळ पाचच ग्राहक असावेत, यामुळे शहरात करोनाचा अधिक उद्रेक होण्याची भिती व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या