नाशिक शहरात करोना संसर्ग वाढला; २ दिवसात ९४ रुग्ण
स्थानिक बातम्या

नाशिक शहरात करोना संसर्ग वाढला; २ दिवसात ९४ रुग्ण

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी

करोना प्रादुर्भाव हा संपर्कातून आणि अगदी नऊ फुटावरुन देखील होत असल्याचे सांगितले जात असतांना याकडे साफ दुर्लक्ष करणार्‍यांना आता करोनाचा विळखा बसु लागला आहे. याचा प्रत्यय आता नाशिक शहरातील वडाळागाव परिसर, पंचवटीतील पेठरोड व दिंडोरीरोड व जुने नाशिक परिसरात येऊ लागला आहे. याठिकाणी कुटुंबच्या कुटुंबच बाधीत होत असून रुग्णालयात पोहचले आहे. शहरात ७ व ८ जुन या दोन दिवसात तब्बल ९४ बाधीत झाल्याचे समोर आले आहे. यामुळे आता करोना संक्रमण झपाट्याने सुरू झाल्याने नागरिकांची जबाबदारी वाढली आहे.

संसर्ग धोकादायक वळणावर पोहचला असुन शहरातील अनेक कुटुंबच्या कुटुंब बधीत होऊन रुग्णालयात उपचार घेत आहे. रविवारी (दि.७)ेे एकाच दिवशी ६१ बाधीत आढळून आल्यानंतर सोमवारी (दि.८) ३३ करोना रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. अशाप्रकारे करोना रुग्णांची आणि मृतांची संख्येत वाढ होत चालली आहे. ६ एप्रिल ते ८ जुन या कालावधीत शहरात करोना रुग्णांचा आकडा आता ४६१ पर्यत पोहचला आहे. तर मृतांचा आकडा २१ झाला आहे. सोमवारी (दि.८) रोजी तब्बल ३३ करोना रुग्ण आढळून आले आहे. यात सायंकाळी साडेसहा वाजता ३ बाधीत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते.

यात स्पेन येथून ३१ मे रोजी नाशिकला दाखल झालेल्या सुंमंगल प्राईड, नेर्लीकर हॉस्पिटलजवळ गंगापूर रोड येथील २२ वर्षीय विद्यार्थी बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाप्रकारे परदेशातून आलेले दोन जणांना करोना झाल्याचे समोर आले आहे. तसेच रविवार पेठ भागातील लोणार गल्ली येथील १४ वर्षाचा मुलगा, गुरुद्वारारोड अभिजीत अपार्टमेंट शिंगाडा तलाव येथील ६५ वर्षीय व्यक्ती करोना बाधीत झाला आहे. जुने नाशिक भागातील बाधीत संपर्कातील आणि ५ जुनला उपचारासाठी दाखल झालेल्या नाईकवाडीपुरा भागातील ६२ वर्षाच्या व्यक्तीचा ७ जुनला करोनामुळे मृत्यु झाला असुन आता मृतांची संख्या २१ झाली आहे.

रात्री आठ वाजता शहरातील संशयितांपैकी १७ नमुने पॉझिटीव्ह आढळून आले आहे. यात अमरधामरोड द्वारका येथिील ४३ वर्षीय पुरुष, अमरधामरोड कुंभारवाडा येतील ३४ वर्षीय महिला, ८०, ३६ वर्षीय पुरुष व १५ वर्षीय मुलगा, अमरधामरोड साईबाबा मंदीर येथील महिन्याचे बालक, नवीन नाशिक पंडीतनगर येथील १८ वर्षीय युवक, नाईकवाडीपुरा जुने नाशिक येथील २७ वर्षीय महिला, नवीन नाशिक येथील ३६ वर्षीय महिला, पेठरोड पंचवटी येथील ५५ वर्षीय पुरुष, शितळादेवी मंदिर अमरधामरोड ८५ वर्षाचा वृध्द, सुभाषरोड ना. रोड येथील ५५ वर्षीय महिला, अजमेरी मजिद येथील ६९ वर्षीय महिला, महाराणा प्रतापनगर पेठरोड येथील ६५ वर्षीय महिला, मेरी पंचवटी येथील ६० वर्षाचा पुरुष, खडकाळी भद्रकाली येथील ४३ वर्षीय महिला व आझाद चौक जुने नाशिक येथील ६५ वर्षीय महिला यांचा समावेश होता.

त्यानंतर रात्री दहा वाजता आलेल्या संशयितांच्या नमुना चाचणी अहवालातून १४ पॉझिटीव्ह आढळून आले होते. यात जुने नाशिक भागातील बागवानपुरा येथील ४२, २५, ५० वर्षीय महिला व ५ वर्षाचे बालक, बदर मंजील जुने नाशिक येथील ३७ वर्षीय महिला, सिन्नर फाटा ६७ वर्षीय महिला, सुशिला बंगलो भाभानगर येथील ४१ वर्षीय महिला, कोकणीपूरा भागातील ६८ वर्षीय पुरुष, ओमसाई पार्क पिंगळेनगर पेठरोड येथील एकाच कुटुंबातील ४१, ३८ वर्षीय पुरुष व २४ वर्षीय महिला, लिला स्मृती बंगला टीबी सॅनेटेरियम दिंडोरीरोड येतील ३५ वर्षीय पुरुष व आनंदवल्ली बजरंगवाडी येथील ३९ वर्षीय पुरुष अशांचा यात समावेश आहे. महापालिका क्षेत्रातील बाधीतांचा आकडा ४६१ इतका झाला आहे.

दरम्यान शहरात आजपर्यत करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या ३८३१ झाली असुन यातील ९४५ जणांचा देखरेखीखालील १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात ३८३१ संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर ३५३१ जणांना घरी सोडण्यात आले. दरम्यान ६ एप्रिल ते ८ जुन २०२० या कालावधीत शहरात ४६१ रुग्ण आढळून आले असुन रुग्ण राहत असलेल्या घराजवळील परिसर व इमारती – बंगले असे १३९ भाग आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर केले होते. यातील ३३ परिसर व ५ इमारती असे एकुण ३८ प्रतिबंधीत क्षेत्रात नव्याने करोना रुग्ण आढळून न आल्याने येथील निर्बंध हटविण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com