२७ मे रोजी विविध शेतकरी संघटना पाळणार ‘ निषेध दिन ‘, सिटू चा पाठिंबा
स्थानिक बातम्या

२७ मे रोजी विविध शेतकरी संघटना पाळणार ‘ निषेध दिन ‘, सिटू चा पाठिंबा

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने २७ मे रोजी करोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला आलेले अपयश , तसेच कोविड संकटाचा फायदा घेत आहेत,  मोदी सरकारच्या निषेधार्थ देशातील विविध शेतकरी संघटना  निषेध दिन पाळणार आहेत. शेतकर्‍यांच्या या निषेध दिनास  महाराष्ट्र सीटूच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे.

करोना संकटाचा मुकाबला करण्यात मोदी सरकारला संपूर्ण अपयश आले आहे.या काळामध्ये कामगार, गोरगरीब, कष्टकऱ्यांची उपासमार झाली . स्थलांतरित कामगारांची प्रचंड हाल झाले.मोदी सरकारने जाहीर केलेले २० लाख करोडचे पॅकेज हे संपूर्णपणे फसवेगिरी असल्याचेडॉ. डी. एल. करोड यांंनी स्पष्ट केले .

या काळात मोदी सरकारने कामगारांच्या वेतनात कपात, महागाईभत्ता कपात करणे, कामगार कायदे स्थगीत करणे असे अनेक कामगार विरोधी निर्णय घेऊन कामगारांच्या जगण्यावर व कायदेशीर हक्कांवर घाला घातला असल्याची टीकाही डॉ कराड यांनी केली.

त्याच पद्धतीने या संकटाचा फायदा घेऊन मोदी सरकार शेतकर्‍यांवर सुद्धा अन्याय करीत आहे. शेतकऱ्यांना कोविड काळामध्ये फारशी मदत सरकारने केलेली नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण मजूर संकटात आहेत. तसेच शेतकऱ्यांची जमीन कोर्पोरेटला हडपता यावी यासाठी मदत करणारे निर्णय घेतले आहेत.

या विरोधात व शेतकरी वर्गाच्या मागण्यांसाठी शेतकरी संघटना २७ मे निषेध दिन पाळणार आहेत.त्याला सीआयटीयु जाहीर पाठिंबा देत आहे. असे महाराष्ट्र सिटू अध्यक्ष व राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी एल कराड, राज्य सरचिटणीस एम एच शेख सांगितले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com