लासलगाव दुर्देवी घटनेमधील पीडितेची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस
स्थानिक बातम्या

लासलगाव दुर्देवी घटनेमधील पीडितेची मुख्यमंत्र्यांनी केली विचारपूस

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

निफाड तालुक्यातील लासलगाव बसस्थानकात  पीडित महिला रसवंतीगृहाजवळ बसची वाट पाहत होती. त्यावेळी अचानक चार अज्ञात तरूणांनी महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवले. या दुर्देवी घटनेमध्ये महिला गंभीर भाजली आहे. सध्या तिला नाशिक जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी अशी दुर्देवी घटना घडल्यामुळे पोलिसांनी याकडे गांभिर्यानं घेतले आहे.

दरम्यान ,या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडितीची चौकशी केली मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून पीडितेच्या पीडितेवर आवश्यक ते उपचार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

 हा हल्ला दुर्दैवी आहे .तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल. बाटलीमध्ये पेट्रोल देणाऱ्या पंप चालनकावरही कारवाई करण्यात येईल , या आधीच्या घटनांमध्ये आरोपींनी ज्या पंपावरून पेट्रोल घेतले त्या पंप चालकांवर देखील कारवाई करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे .

Deshdoot
www.deshdoot.com