भुसावळ-पुणे एक्सप्रेस ३० जानेवारी पर्यंत दौंडमार्गे धावणार
स्थानिक बातम्या

भुसावळ-पुणे एक्सप्रेस ३० जानेवारी पर्यंत दौंडमार्गे धावणार

Abhay Puntambekar

नाशिकरोड । प्रतिनिधी

भुसावळहून नाशिकमार्गे पुण्याला जाणारी भुसावळ-पुणे एक्सप्रेस ही रेल्वे गाडी दि. २१ ते ३० जानेवारीपर्यंत मनमाड-दौंडमार्गे धावणार आहे. गेल्या १५ आक्टोबरपासून म्हणजे तीन महिन्यांपासून ही गाडी दौंडमार्गेच धावत आहे.रेल्वेने दिलेल्या प्रसिध्द पत्रकात म्हटले आहे  की, दक्षिण पूर्व घाटात मंकी हिला आणि कर्जत दरम्यान पायाभूत सुविधांचे काम सुरु आहे. त्यामुळे भुसावळ-पुणे ही गाडी नाशिकमार्गे धावणार नाही. तिचा मार्ग दौंडमार्गे करण्यात आला आहे.

पुण्याला जाण्यासाठी रेल्वेगाडी हा सर्वात स्वस्त व सुरक्षित मार्ग असल्याने तसेच रस्तामार्गापेक्षा कमी वेळ लागत असल्याने रेल्वे प्रवासी या गाडीला प्राधान्य देत आहेत. मात्र, नाशिककरांच्या हक्काची ही गाडी अडीच महिन्यांपासून दौंडमार्गे धावत आहे. आणखी पंधरा दिवस म्हणजे साडेतीन महिने ती नाशिकमार्गे जाणार नसल्याने नाशिककरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com