भुसावळ-नाशिक-पुणे एक्सप्रेस २० पर्यंत मनमाड-दौंड मार्गे
स्थानिक बातम्या

भुसावळ-नाशिक-पुणे एक्सप्रेस २० पर्यंत मनमाड-दौंड मार्गे

Abhay Puntambekar

नाशिकरोड । प्रतिनिधी 

मध्य रेल्वेने दक्षिण पूर्व घाटात पायाभूत सुविधांचे काम हाती घेतलेले आहे. त्यामुळे भुसावळ-नाशिक-पुणे या एक्सप्रेस गाडीचा मार्ग दि. ८ ते २० फेब्रुवारीपर्यंत बदलण्यात आला आहे. ही गाडी नाशिकरोडला न येता मनमाडहून दौंडमार्गे धावेल, अशी माहिती रेल्वेने प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

कर्जत, मंकी हिल येथे पायाभूत सुविधा, लोहमार्ग दुरुस्ती आदी कामे सुरु आहेत. त्यामुळे गेल्या १५ आक्टोंबरपासून भुसावळ-पुणे गाडी नाशिकरोडहून न जाता मनमाड-दौंड मार्गे पुण्याला जात आहे. तसेच तिकडून मनमाड-दौंडमार्गेच भुसावळला जात आहे. त्यामुळे पुण्याला थेट रेल्वे नसल्याने नाशिककरांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना तिप्पट पैसे तसेच जादा वेळ, श्रम खर्ची करुन बस अथवा खासगी वाहनाने पुण्याला जावे लागत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com