Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकत्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थावर स्नानास बंदी

त्र्यंबकेश्वर कुशावर्त तीर्थावर स्नानास बंदी

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी

येथील कुशावर्त तीर्थात स्नानास बंदी घालण्यात आली आहे. नगरपलिकेचे मुख्यधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी माहिती दिली. दरम्यान येथील अहिल्या गोदावरी घाटावर असणारी वर्दळ थांबली आहे. भाविकांची संख्या ७० टक्के घटली आहे. गंगाद्वार, ब्रम्हगिरी पर्वतीवर जाण्यास मनाई आहे वन खाते व मेंटघेरा किल्ला ग्रामपंचायत यांचे कडून वरील निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

धार्मिक विधी बंद

त्र्यंबकेश्वरला होणारे धार्मिक विधी त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने बंद ठेवले आहे सध्या करोना विषाणूच्या  पार्श्वभूमी वर हा निर्णय घेण्यात  आला आहे भाविक व पुरोहित यांनी या सुचनेची दखल घ्यावी असा जाहीर फलकच येथील गंगा गोदावरी मंदिरावर लावण्यात  आला आहे पुढील आदेश होई पर्यंत पर्यंत हे विधी बंद ठेवण्यात  येणार आहे जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशानुसार वरील निर्णय झाला आहे.

दरम्यान ७० टक्के भाविक यात्रेकरू घटले आहेत दरम्यान त्र्यंबकेश्वरचे जीवनमान केवळ यात्रेकरू वर अवलंबून आहे अशा परिस्थितीत गेले चार दिवसापासून यात्रेकरू नसल्याने  सर्व दुकाने बंद बाजारात नगरीत शुकशुकाट आहे   त्या मुळे आता कसे होणार या चिंतने यात्रेकरू वर अवलंबून असलेल्या व्यावसायिक चिंतेत आहे आरोग्य यंत्रणां सतर्क आहे तरी ही विज्ञान क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळींनी करोना सारख्या संकटाशी मात करण्याचे दृष्टीने अधिक संशोधन करणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या