उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी नाशिकचे अनिल माळी यांची निवड
स्थानिक बातम्या

उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी नाशिकचे अनिल माळी यांची निवड

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

जळगांव येथे एक व दोन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी नाशिकचे पक्षी व तज्ज्ञ शिक्षक अनिल माळी निवड झाली आहे. या संमेलनाचे आयोजन जळगांव जिल्ह्यातील निसर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थांनी केले आहे. जळगावच्या जैन हिल्सवरील ‘गांधी तीर्थ’ येथे हे संमेलन होणार आहे. संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना ‘पाणथळींचे संवर्धन आणि यावलचे पक्षी जीवन’ हे आहे.

संमेलनाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा पर्यावरण कार्यशाळा शाळेत होणार आहे. संमेलनाचे निमंत्रक जळगावचे पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे असून सह निमंत्रक अश्वीन पाटील (अमळनेर) आणि शैलेन्द्र महाजन (जळगाव) तर संयोजक उदय चौधरी (वरणगांव), सहसंयोजक इम्रान तडवी व समन्वय समिती डॉ. सुधाकर कुऱ्हाडे (अहमदनगर), अभय उजागर, रविंद्र सोनवणे, राजेंद्र नन्नावरे (जळगांव), विक्रम पाटील, जितेंद्र वाणी हे आहेत.

अनिल माळी हे डॉ. सुधाकर कुऱ्हाडे यांचेकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. पुढील दोन वर्ष तेच अध्यक्ष राहतील. अनिल माळी हे पक्षी, पर्यावरण, वन्यजीव छायाचित्रण क्षेत्रात अभ्यासक, रक्षक, शिक्षक, प्रेरक आणि लाणि लेखक व संशोधक म्हणून परिचीत आहेत.
पक्षी प्राणी जैविक वविधता यावर ८ पुस्तके प्रकशित असून चार चित्रफीतींची निर्मिती केलेली आहे. छायाचित्रणाच्या निमित्ताने भारतातील ५० पेक्षा जास्त अभयाराण्य यांना भेटी तसेच नेपाळ, इंडोनेशिया – बाली येथे भेटी दिल्या आहेत.

शासनातर्फे वने व वन्यजीव संवर्धनाबद्दल त्यांना गौरविण्यात आलेले आहे. तसेच जळगांव ‘वसुंधरा-ग्रीन टीचर’ अ‍ॅवार्ड असे ३० पेक्षा जास्त पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. नाशिक जिल्हा व महाराष्ट्रभर ५०० पेक्षा जास्त ठिकाणी त्यांनी व्याख्याने व सादरीकरणातून विद्यार्थी व नागरीकांमध्ये वने व वन्यजीवांबद्दल जागृती केली आहे.

वन्यजीव विषयक छायाचित्र प्रदर्शने जहांगिर आर्ट गॅलरी, मुंबई, इंडोनेशिया – बाली तसेच नाशिक, जळगांव, बारामती, औरंगाबाद, यवतमाळ इ. ठिकाणी प्रदर्शने झाली आहेत. ते नाशिक जिल्हा जैवविधिता समितीचे सदस्य असून महाराष्ट्र पक्षीमित्र, वाईल्डलाईफ हेरिटेज आदी संस्थेंचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. अनिल माळी हे मॉडर्न हायस्कूल सिडको येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com