दिंडोरी : ओझे येथे पुन्हा बिबट्याची दहशत
स्थानिक बातम्या

दिंडोरी : ओझे येथे पुन्हा बिबट्याची दहशत

Abhay Puntambekar

ओझे | प्रतिनिधी 

दिंडोरी तालुक्यातील ओझे येथे पुन्हा बिबट्याने दहशत निर्माण केली असून काल ज्या ठिकाणी वासरू ठार केले होते त्यांच्या लक्ष्मण जोपळे यांच्या वस्तीवर आज संध्याकाळी ७.१० मिनिटावी पुन्हा आरामात आगमन केले होते मात्र, त्यांचा मुलगा बाहेर असल्यामुळे मोठे संकट टळले आहे.

बिबटयांचे आगमन होताच आवाज केल्यांमुळे बिबटयां आरामात माघारी फिरला हा बिबटयां खूप मोठा व उंच आहे असे पाहण्यात आले त्यांमुळे ओझे गावातील मळ्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जेव्हा आज बिबटया तेथे आला त्यावेळेस तेथे गाय पण होती मात्र बाहेर मानसे असल्यांमुळे गायीचे प्राण वाचले आहे ओझे परिसरामध्ये गेल्या चार वर्षापासून मोठयाप्रमाणात बिबटयांचा वावर आहे त्यांमुळे शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओझे परिसरामध्ये अनेक ठिकाणी गाय, वासरू,कुत्रे मारण्याच्या घटना घडत आहे यासाठी वनविभागाने घडक पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे मात्र वनविभागाकडून बिबटयां पकण्यासाठी कुठलीही मोहिम हाती घेतली जात नाही .वनविभागाने त्वरित या ठिकाणी बिबटयां पकण्याची मोहिम हाती घ्यावी आशी मागणी शेतकरी लक्ष्मण जोपळे यांनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com