५९ वी  महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धा :  ‘सा प्रतीक्षतेः’ नाटकास प्रथम  पारितोषिक जाहीर
स्थानिक बातम्या

५९ वी महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धा : ‘सा प्रतीक्षतेः’ नाटकास प्रथम पारितोषिक जाहीर

Abhay Puntambekar

नाशिक प्रतिनिधी
५९ व्या महाराष्ट्र राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंद्रधनु कलाविष्कार संस्था, मिरज या संस्थेच्या ‘सा प्रतीक्षतेः’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

तर संस्कृत भाषा प्रचारिणी सभा, नागपूर या संस्थेच्या नारी ह्दय विलासः या नाटकास द्वितीय पारितोषिक आणि शैक्षणिक सामाजिक बहु. संस्था, नाशिक या संस्थेच्या मंजुला या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे

भरत नाट्य संशोधन मंदिर पुणे शिवाजी मंदिर, दादर/सायंटिफिक सभागृह, नागपूर/साईखेडकर नाट्यगृह, नाशिक येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण २३ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमती जयश्री साठे, श्रीमती रेखा मुजुमदार आणि श्रीमती मंजुषा कुलकर्णी यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेचा अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक डॉ.रिध्दी कुलकर्णी ( नाटक- सा प्रतोक्षतेः), द्वितीय पारितोषिक
डॉ.प्रसाद भिडे (नाटक- अक्ष एवजयतेः),

नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक प्रभाकर भातखंडे (नाटक- विद्या तु
भस्मसात भूता), द्वितीय पारितोषिक अधीश गबाले ( नाटक- सुंदरी),

प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक आर्याशिंगणे (नाटक-लोकाभिरामः श्रीराम), द्वितीय पारितोषिक अभिप्राय पारकर (नाटक- पण्डितः अपण्डीतः),

नेपथ्य :प्रथम पारितोषिक जुई गोखले (नाटक-सा प्रतीक्षतेः), द्वितीय पारितोषिक स्वप्नील बोहोटे ( नाटक-नारीह्दयविलासः), रंगभूषा : प्रथम पारितोषिक सचिन वारीक ( नाटक-भक्त्या लभ्यः ), द्वितीय पारितोषिक सृष्टी देशमुख (नाटक-सुवर्णमध्यः )

उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक : आयुष गोखले (नाटक-नारीहदयविलास ः ), मानसगोखले (नाटक-पण्डितः अपण्डितः), डॉ.रिध्दी कुलकर्णी ( नाटक- सा प्रतीक्षते), रिया हिंगणे ( नाटक-मंजुला), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे : श्रुती मेहंदळे (नाटक-संगीतः संकिर्तनम्), मीरा परांजपे ( नाटक-अक्ष एव जयते), मयुरो टोंगळे (नाटक-नारिहदयविलासः), रेणूका पंचपोर (नाटक- सुंदरी), मल्हार गिरब (नाटक-भक्त्या
लभ्यः), चिन्मय पुजारी (नाटक-संगीत संकीर्तम), रविंद्र संगवई ( नाटक नारीहदयविलास), अमेय खरे (नाटक-
संगीत संकीर्तनम).

Deshdoot
www.deshdoot.com