Sunday, April 28, 2024
Homeनाशिकएमएचटी सीईटीसाठी ४ लाख ४८ हजार ६८५ अर्ज

एमएचटी सीईटीसाठी ४ लाख ४८ हजार ६८५ अर्ज

आठ शिक्षणक्रमांसाठी राबविणार प्रवेशप्रक्रिया

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

इंजिनिअरिंगच्या बीई, बी. टेक, फार्मसीमधील बी. फार्म व डी. फार्म आणि कृषी शाखेच्या बी. एस्सी अ‍ॅग्रीसह विविध आठ शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी येत्या एप्रिल महिन्यात एमएचटी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. या सीईटी परीक्षेसाठी आतापर्यंत ४ लाख ४८ हजार ६८५ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले आहे.

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही सर्वाधिक विद्यार्थ्यांचा ओढा या तीन व्यावसायिक शाखांकडे कल असल्याचे प्रवेश अर्जाच्या संख्येवरून दिसून येत आहे. गेल्या वर्षी एमएचटी सीईटीसाठी ४ लाख ३० हजार विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. तंत्रशिक्षणातील बीई, बी. टेक या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य आहेत.

तर फार्मसीमधील बी. फार्म व डी. फार्म तसेच कृषी शाखेच्या बी. एएस्सी अ‍ॅग्रीसह विविध पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी ही सीईटी परीक्षा संयुक्तरित्या घेतली जाणार आहे. सीईटी परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना पूर्वकल्पना येऊन परीक्षेची तयारी करण्यासाठी सीईटी सेलकडून उच्च शिक्षणाच्या आठ व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणाच्या दहा अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाणारी एमएचटी-साईटी परीक्षा १३ ते २३ एप्रिलदरम्यान होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या