Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनाशिकरोडमध्ये ‘हॅप्पी फ्रिज’चे लोकार्पण; उरलेले अन्न गरजवंतांची भूक भागवणार

नाशिकरोडमध्ये ‘हॅप्पी फ्रिज’चे लोकार्पण; उरलेले अन्न गरजवंतांची भूक भागवणार

नाशिकरोड । प्रतिनिधी

सध्या घरात व मोठ्या हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ शिल्लक राहतात. ते फेकून दिले जात असल्यामुळे अन्नाची नासाडी होते. हॉटेलमध्येही जेवण झाल्यानंतर खाद्यपदार्थ शिल्लक राहते. हे खाद्यपदार्थ फेकून न देता ते एका ठिकाणी आणून गरजवंतांना दिल्यास सामाजिक ऋण फेडण्याच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे.

- Advertisement -

झोमॅटो फ्रडिंग इंडिया या संस्थेच्या वतीने दत्तमंदिर रोडवरील हॉटेल कृपा बाहेर ‘हॅप्पी फ्रिज’चे उद्घाटन नगरसेवक रमेश धोंगडे व सूर्यकांत लवटे यांचे हस्ते झाले. या फ्रिजमध्ये उरलेले अन्न आणून ठेवल्यास गरजवंत व्यक्तीला त्याचा लाभ होऊन त्याची भूक मिटण्यास मदत होईल.

नाशिकरोड परिसरात सात, आठ ठिकाणी हॅप्पी फ्रिज ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन संयोजकांनी केले. यावेळी दिलीप गंगवाणी, प्रिया सोबळकर, पूनम कनव, सतपालसिंग छाब्रा, अ‍ॅनी थॉमस, निशा देशमुख, वंदना साधवाणी, विशाल गारडे, संदीप महाजन, महेंद्र सूर्यवंशी, शैलेश शिंदे, दीपिका मेहता, निता धमेंजा, राकेश परमार, विनीत सोबळकर, अभिजित धोंगडे आदि उपस्थित होते.

शहर परिसरात अनेक हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात उरलेल्या अन्नाची नासाडी होते. तसेच लग्न सोहळ्यातही बरेच अन्न शिल्लक राहते. याशिवाय घरातही उरलेले अन्न फेकून दिले जाते. मात्र उरलेले अन्न गरजवंतांची भूक भागवू शकते. ही बाब लक्षात घेऊन ‘हॅप्पी फ्रिज’ ही संकल्पना राबवत असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
रमेश धोंगडे, नगरसेवक

- Advertisment -

ताज्या बातम्या