उद्योगांसाठीचा ‘इटीपी’ तातडीने उभारा
स्थानिक बातम्या

उद्योगांसाठीचा ‘इटीपी’ तातडीने उभारा

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी

नाशिकच्या प्लेटींग व सरफेस ट्रिटमेंट उद्योगांसाठीच्या ‘ इफ्ल्यूएंट ट्रिटमेंट प्लँट’ (इटीपी)च्या उभारणीचे काम ताबडतोब सूरू करण्याचे निर्देश देत,याबाबत एमआयडीसी कडून असलेल्या खोळंब्यातून तातडीने मार्ग काढून कामाला प्रारंभ करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव इ. रविंद्रन यांनी दिले.

नाशिक विभागातील प्रदूषणाचा वाढता स्तर त्यासोबतच मंजूर असूनही रखडलेला ‘इफ्ल्यूएंट ट्रिटमेंट प्लँट’(इटीपी)चे काम या बाबत आढावा घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव इ. रविंद्रन यांनी नाशिकला भेट देऊन पहाणी केली. याबाबत त्यांनी एमआयडीसी,प्लेटींग उद्योग संघटना, मनपा अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन माहीती गेतली. व तातडीने प्रकल्प उभारणीला सूरूवात करण्याच्या सूचना दिल्या. त्यादृष्टीने प्रत्यक्ष जागेची पहाणी करुन प्रकल्प उभारणी बाबत मार्गदर्शक सूचना केल्या.

या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव इ.रविंद्रन, पीएसओ डॉ. अमर सूपाते, सहसंचालक डॉ. वाय. बी.सोनटक्के, प्रदेशिक अधिकारी जे.बी.संगेवार, उपप्रदेशिक अधिकारी पी.एन. धुमाळ, एआयडीसीचे एस.एस. अकूलवार, एनपी पाटील, जे.बी.चवरकर तसेच प्लेटींग उद्योगांच्या वतीने समिर पटवा, सचिन तरटे, उमेश वाशी, प्रकाश प्रधान आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

भूमिगत गटार प्रश्न सोडवा

भूमिगत गटार याजनेची जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने त्यांनी मनपा व एमआयहीसी या दोघांना कडक शब्दात निर्देश दिले आहेत. यामामत दोघांनी जबाबदारी निश्चित करुन तातडीने व्यवस्था करण्याचेही निर्देश दिले.मनपा व एमआयडीसी या दोघांमध्ये या प्रकल्पाबद्ल टोलवा टोलवी चाललेली आहे. ती ताबडतोब बंद करुन जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com