जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका तूर्तास स्थगित
स्थानिक बातम्या

जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका तूर्तास स्थगित

Abhay Puntambekar

करोना इफेक्ट : तीन महिने पुढे ढकलल्या

नाशिक । प्रतिनिधी

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील १०२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. आयोगाकडून पुढील सूचना येईपर्यंत निवडणुका तूर्तास स्थगित करण्यात आल्या आहेत.

आपतकालीन परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलणेे किंवा त्या रद्द करण्याचे अधिकारी राज्य निवडणूक आयोगास आहे. निवडणुकीत गर्दी होत असते. त्यामुळे आयोगाने राज्यातील सर्वच प्रकारच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय प्रभाग रचनांचा कार्यक्रमही आहेत्याच स्थितीत स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपणार्‍या कळवण २९, येवला २५, दिंडोरी ४४, इगतपुरी ०४ अशा ४ तालुक्यांतील १०२ ग्रामपंचायतींसाठी ३१ मार्चला मतदान आणि १ एप्रिलला मतमोजणी होणार होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com