नाशिक शहरातील करोना बाधीतांचा आकडा ५१२
स्थानिक बातम्या

नाशिक शहरातील करोना बाधीतांचा आकडा ५१२

Abhay Puntambekar

१० दिवसात ९७८ संशयित रुग्ण दाखल

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता महापालिका, पोलीस यंत्रणेकडुन आता आता चिंता व्यक्त केली जात असतांना आता हॉटस्पॉट भागातील नागरिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे.सामाजिक अंतर पालन, लक्षणे दिसल्यास रुग्णालयात दाखल झाल्यास करोनाचा प्रादुर्भाव होणार नाही अशी जनजागृतीवर आता भर दिला जात आहे. शहरात ७, ८, ९ व १० जुन या ४ दिवसात तब्बल १४१ बाधीत झाल्याचे समोर आले आहे. शहरात करोना बाधीतांच्या संपर्कात आलेले आणि लक्षणे असलेली शंभराच्यावर संशयित रुग्णालयात दाखल होत असुन गेल्या दहा दिवसात हा आकडा ९७८ इतका झाला आहे.

शहरात बुधवारी (दि.१०)ेे एकाच दिवशी २७ बाधीत आढळून आले असुन दोन वृध्दांचा मृत्यु झाला असुन आता मृतांची संख्या २४ झाली आहे. १ ते १० जुन या कालावधीत शहरात २८१ करोना रुग्ण वाढले आहे. तर ६ एप्रिल ते १० जुन या कालावधीत शहरात करोना रुग्णांचा आकडा आता ५१२ पर्यत पोहचला आहे. बुधवारी तब्बल २७ करोना रुग्ण आढळून आले आहे. यात सायंकाळी साडेसहा वाजता ५ बाधीत असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. यात भद्रकाली फ्रुट मार्केट भागातील ६२ वर्षीय महिला, लेेखानगर आदर्श सोसायटी मधील बंगला क्रमांक चौदा येथील ६१ वर्षीय वृध्द, जयभवानी रोड जाचक मळा ना. रोड येथील ४१ वर्षीय पुरुष, बडी दर्गासमोर उर्दु स्कुल जवळील ६४ वर्षीय महिला, सातपूर अंबड लिंकरोड ४३ वर्षीय व्यक्ती यांचा समावेश आहे.

तसेच सायंकाळी साडेसात वाजता आलेल्या अहवालात सहा पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले. यात जुने नाशिक भागातील नाईकवाडीपुरा येथील ६२ व ३६ वर्षीय महिला, मुंबईनाका भाभानगर येथील ५०वर्षीय व्यक्ती व २२ वर्षीय युवती, नाशिकरोड सुभाष रोड येथल ४५ वर्षीय महिला, अशोका मार्ग नारायणनगर येथील ६४ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

त्यानंतर रात्री १० वाजता शहरातील १६ अहवाल पॉझिटीव्ह आले आहे. यात भाभानगर येथील १९ वर्षीय युवती, अमृतधाम जवळील बीडी कामगारनगर येथील २१ वर्षीय युवक, नाशिकरोड सुभाषरोड येथील १ वर्षाचे बालक, काझी गल्ली शितळा माता मंदिर जुने नाशिक भागातील १६ वर्षीय युवती व ५२ वर्षीय महिला, भाभानगर सुशिला बंगलो येथील २४ वर्षीय युवती व ५३ वर्षीय पुरुष, सारडा सर्कल भागातील ८० वर्षीय महिला, महाराणा प्रतापनगर दिंडोरीरोड पंचवटीतील ४२ वर्षीय महिला, फुलेनगर येथील कालिकानगर गल्ली नं. ९ येथील एकाच कुटुंबातील ६९ वर्षीय महिला व १८ वर्षीय युवती, म्हसरुळ दिंडोरीरोड गुलमोहरनगर येथील ७५ वर्षीय महिला, २१ वर्षीय युवक, १५ वर्षाची मुलगी व ४३ वर्षाची महिला, लक्ष्मी अपार्टमेंट पेठरोड दत्तनगर येथील ७५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. अशाप्रकारे महापालिका क्षेत्रातील बाधीतांचा आकडा ५१२ इतका झाला आहे. दरम्यान शहरात आजपर्यत करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या ४०५४ झाली असुन यातील ९४५ जणांचा देखरेखीखालील १४ दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात ४०५४ संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर ३८५० जणांना घरी सोडण्यात आले.

शहरात दहा दिवसात ९७८ संशयित रुग्ण दाखल
शहरात ज्या प्रमाणात दरररोज करोना संशयितांचा आकडा वाढत आहे, त्याच प्रमाणात शहरातील रुग्णांचा आकडा वाढत आहे. शहरात दररोज सरासरी ९७ संशयित रुग्णालयात दाखल होत आहे. यात विशेषत: बुंधवांर (दि.१०) पंर्यत गेल्या तीन दिवसात दररोज शंभराच्या वर संशयित दाखल झाले असुन हा वाढता आकडा चिंताजनक मानला जात आहे. याच संशयितांतून नवीन करोना बाधीत समोर येत आहे.

* एकुण पॉझिटीव्ह – ५१२
* पुर्ण बरे झालेले – १८३
* मृत्यु – २४
* उपचार घेत असलेले – ३०५
* प्रलंबीत अहवाल – १२९
* प्रतिबंधीत क्षेत्र – १०३

Deshdoot
www.deshdoot.com