जळगाव निंबायती येथील ६५ वर्षाच्या आजीबाईचा खून नातवानेच केल्याचे उघड
स्थानिक बातम्या

जळगाव निंबायती येथील ६५ वर्षाच्या आजीबाईचा खून नातवानेच केल्याचे उघड

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती येथील ६५ वर्षीय वृद्धेचा खून झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

२५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गळा आवळून कमलाबाई जगताप या वृद्धेचा गळा आवळून केल्याची घटना घडली होती.
यांनतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. यानंतर मयत कमळाबाई यांच्या कुटुंबियांशी चर्चा करून तपासाला गती दिली होती.

ही महिला काही दिवसांपूर्वी तिच्या मुलाकडे सिन्नर येथे गेली होती. यावेळी याठिकाणी महिलेचा नातू आकाश जगताप हा घडलेल्या घटनेपासून घरी नसल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेकडून याबाबत कसून तपास करून नातू आकाश याचा शोध सुरु केला. दरम्यान, आकाश यास कसारा जिल्हा ठाणे येथून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सोबती आकाश शिरसाठ व अजय ताकतोंडे यास ताब्यात घेतले.

आकाश याने आपल्या आजीला मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती येथे २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री गळा आवळून खून केल्याचे कबूल केले.

काय आहे घटना ?

वरील घटनेतील आजीबाईकडे घर विकल्याचे दोन लाख रुपये होते. आजी सिन्नर येथील आपल्या मुलाकडे वास्तव्यास होती. त्यानंतर आजी पुन्हा जळगाव निंबायती येथे मुळगावी राहण्यासाठी आली होती. आजीकडे पैसे आहेत पण आजी देत नसल्याने नातू आकाश जगताप हा आपल्या दोन्ही मित्रांसोबत पैसे घेण्यासाठी आजीकडे गेला होता.

यावेळी आजीकडे पैसे मागितले असता आजीने ते नाकारले. याचा राग येऊन नातवाने आजीचा गळा आवळून खून केला होता. यानंतर याच दिवशी नातू आकाश याने साथीदार आकाश शिरसाठ यास १५ हजार आणि दुसरा साथीदार अजय ताकतोंडे यास १० हजार रुपये देऊन पसार झाला होता.

Deshdoot
www.deshdoot.com