पालकांनी मुलांमध्ये खेळाचे प्रेम वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहावे-संजय खंदारे
स्थानिक बातम्या

पालकांनी मुलांमध्ये खेळाचे प्रेम वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहावे-संजय खंदारे

Dinesh Sonawane

‘निवेक अशोका ओपन-2020’चा शानदार शुभारंभ

सातपूर । प्रतिनिधी

मुलांमध्ये खेळाची आवड असली तरी त्यासाठीं त्यांना सवड दिली जात नाही पालकांनी मुलांच्या क्रिडा प्रेमाला प्रोत्साहन द्यावे ज्या माध्यमातून भविष्यात येणार्‍या ताणतणावातून मूक्ती मिळवण्यासाठी खेळ हे महत्वाचे साधन ठरणार असल्याचे प्रतिपादन मनपाचे माजी आयुक्त संजय खंदारे यांनी केले.

उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य क्रीडा संस्था नाशिक इंडस्ट्रीज वेल्फेअर सेंटर (निवेक)तर्फे आयोजित करण्यात आलेल्यां ‘निवेक अशोका ओपन-2020’ या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करताना श्री खंदारे बोलत होते.

त्यांनी स्पर्धा आयोजनातील सातत्याबद्दल निवेक पदाधिकार्‍यांबद्दल गौरवोद्गार काढतानाच कोणत्याही मोठ्या स्पर्धांचे आयोजन हे नियोजनासोबतच जनसमूदायाच्या प्रतिसादावर होत असल्याचे सांगितले.

निवेकच्या मैदानावर दि. 4 ते 31 जानेवारी दरम्यान लॉन टेनिस, बिलियर्डस्, चेस, बॅडमिंटन, स्वीमिंग, टेबल टेनिस, ट्रायथलॉन या खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

निवेक या महोत्सवाचे गेल्या 27 वर्षांपासून आयोजन करीत असून खेळास पोषक वातावरण तयार व्हावे व सद्भावना निर्माण व्हावी हा या स्पर्धा आयोजनाचा उद्देश असल्याचे निवेक अध्यक्ष संदिप गोयल यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी विशेष अतिथी अशोका उद्योग समूहाचे संचालक आशिष कटारिया यांनी शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी नाईस कार्यालयासमोरुन नाईसचे उपाध्यक्ष रमेश वैश्य यांच्याहस्ते सायंकाळी 4 वाजता सद्भावना मशाल दौड आयोजित करण्यात आली या दौडचा समारोप निवेक येथे करण्यात आला. त्यानंतर निवेक ओपन क्रीडा महोत्सवास प्रारंभ करण्यात येईल.

निवेक ओपन स्पर्धेत लॉन टेनिस, बिलियर्डस्, चेस, बॅडमिंटन, स्वीमिंग, ट्रायथलॉन या खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. त्यात विविध वयोगटातील खेळाडूंना सहभाग घेता येणार असल्याचे क्रीडा सचिव पंकज खत्री यांनी सांगितले.

पाहुण्याचे स्वागत उपाध्यक्ष जनक सारडा यांनी केले तर सूत्रसंचलन करुन आभार रणजीतसिंग सौंध यांनी मानले.यावेळी व्यासपिठावर माजी अध्यक्ष राजकुमार जॉलीह होते.

यावेळी अशियात प्रथम असलेल्या लहान आयर्नपटू अर्णव जयसिंघानी तसेच आयर्नमॅन महेंद्र छोरीया व प्रशांत डबरीयाचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवेकचे पदाधिकारी सभासद मोठ्या संख्यने उपस्थित होते.

या स्पर्धां यशस्वितेसाठी प्रशिक्षक विविध क्रिडा प्रशिक्षक हिरेन बुझरुक, नरहर गर्गे, सिद्धार्थ वाघ, अख्तर शेख, विजय ठाकूर यांच्यासह अशोक रेडे, नामदेव निकम, गोपाळ सदगुणे, बापू बोरसे, विशाल कस्तुरे, भूषण सदगुणे, वैभव गाडेकर आदी प्रयत्नशील आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com