Friday, April 26, 2024
Homeनाशिकनिसर्ग कोपला; नाशिक जिल्ह्यात पोल्ट्रीफार्मचे पत्रे उडाले; अनेक झाडे उन्मळून पडले

निसर्ग कोपला; नाशिक जिल्ह्यात पोल्ट्रीफार्मचे पत्रे उडाले; अनेक झाडे उन्मळून पडले

नाशिक । प्रतिनिधी

जुनच्या पहिल्या तारखेला केरळमध्ये मान्सुनचे आगमन होत असतांनाच अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने नाशिकमध्ये कहर केलेला आहे. दुपारपासून वाऱ्याचा वेग वाढला आहे तर मुसळधार पाऊसदेखील बरसला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर अनेकांच्या कच्च्या घरांचे पत्रे उडाले.  येवला तालुक्यातील अंदरसूल येथे पोल्ट्री फार्मचे पत्रे उडाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

- Advertisement -

निसर्गचे वादळाचे परिणाम आज जिल्ह्यात दिसुन आले. सकाळपासुनचे ढगाळ वातावरण कायम होते.  यानंतर दुपारी मुसळधार वृष्टी झाली.
सकाळपासुन नाशिक शहर परिसरात पाऊसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर अनेक रस्त्यावर पाणी साठले गेले. तर काही भागात पाऊसामुळे नागरिकांची धावपळ उडाल्याचे दिसुन आले.

शहरात पुर्व भाग असलेल्या पंचवटी विभागात पाऊसाने हजेरी लावली. यात आडगांव शिवारात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शहरातील देवळाली कॅम्प व देवळालीगांव, नाशिकरोड भागात पाऊसाने नागरिकांची धावपळ उडवून दिली.

याठिकाणी दिवसभर रिमझीम स्वरुपाचा पाऊस सुरू होता. सायंकाळी साडेचार नंतर मात्र पाऊसाचा वेग वाढल्यानंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसत होता.

निसर्ग वादळ नाशिकहून जाणार असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी एका व्हिडीओ च्या माध्यमातून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. दुपारी अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. तर दुसरीकडे ग्रामीण भागात शेतीचेही मोठे नुकसान झालेले बघायला मिळाले.

अंदरसुलला निसर्ग वादळाचा तडाखा बसला. अंदरसुल गोल्हेवाडी रोड परिसरात वादळ धडकुन अंदरसुल धामणगाव शिव परिसरात गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री फामँचे प्रचंड नुकसान झाले. परिसरातील ५०० मीटर शिवारात झाडं उन्मळून पडले पत्रे उडाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या