नाशिकमधील आरोग्य सेवकांचे अहवाल निगेटीव्ह; प्रतिबंधीत क्षेत्रातील अतिजोखमीचे संशयित झाले कमी

नाशिकमधील आरोग्य सेवकांचे अहवाल निगेटीव्ह; प्रतिबंधीत क्षेत्रातील अतिजोखमीचे संशयित झाले कमी

नाशिक । प्रतिनिधी

कोरोना बाधीत देशातून शहरात परतलेल्या व्यक्तींची संख्या पर्यत 754 पर्यत गेली असुन यातील 620 जणांचा देखरेखीखालील 14 दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे.

मागील आठवड्यात ज्या तीन आरोग्य सेवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आरोग्य सेवकांनी नि:श्वास टाकला आहे. दरम्यान शहरातील करोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 5 प्रतिबंधीत क्षेत्रातील अति जोखमीच्या व्यक्तीची संख्या 103 वरुन 77 झाली असल्याने आता करोनाचा धोका कमी झाला आहे.

शनिवारी (दि.25) 3 संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन आता डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या संशयितांची संख्या 35 वरुन 10 वर आली आहे. मागील आठवड्यात महापालिका क्षेत्रात करोनाच्या सर्व्हेसाठी कार्यरत असलेल्या एक डॉक्टर, एक नर्स व एक फार्मासिस्ट यांना करोनाची लक्षणे दिसु लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तिघांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आल्याने आरोग्य विभागाने नि:श्वास टाकला आहे.

आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात 463 संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर 383 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. शनिवारपर्यत संशयितांच्या घशातील स्त्रावाचे पाठविण्यात आलेल्या 463 नमुन्यापैकी 447 अहवाल निगेटिव्ह आले असुन आजपर्यत एकुण 11 करोना रुग्ण आढळून आले आहे.

तसेच केवळ 10 संशयितांने अहवाल प्रलंबीत आहे. तसेच विविध राज्यातील विविध भागातून 355 जण शहरात आले आहे. शनिवारपर्यत शहरात स्टॅम्पींग झालेल्या 800 व्यक्ती असुन आजपर्यत स्टीकर लावलेल्या घरांची संख्या 795 झाली आहे. होम कोरंटाईन केलेल्यांची संख्या 131 इतकी आहे.

शहरात जाहीर करण्यात आलेल्या कंटेन्मेंट एरिया (प्रतिबंधीत भाग) असलेल्या गोविंदनगर, नवश्या गणपती गंगापूररोड, नाशिकरोड धोंगडेनगर बजरंगवाडी (समाज कल्याण वसतीगृह) व संजीवनगर (अंबड सातपूर लिंकरोड) याठिकाणी घरोघर सर्वेक्षणासाठी महापालिका आरोग्य विभागाकडुन 55 पथके कार्यरत झाले आहे.

गोविंदनगर भागात बाधीत रुग्णांच्या संपर्कात 21 कमी जोखमीच्या व्यक्ती, गंगापूर भागातील नवश्या गणपती परिसर भागात अतिजोखमीचे 1 व कमी जोखमीचे 9, नाशिकरोड धोंडगेनगर भागात अतिजोखमीचे 12 व कमी जोखमीचे 5, समाज कल्याण वसतीगृह बजरंगवाडी भागात अतिजोखमीचे 12 व कमी जोखमीचे 153 आणि संजीवनगर भागात अतिजोखमीचे 52 व कमी जोखमीचे 53 अशाप्रकारे एकुण 77 अतिजोखमीचे आणि 241 कमी जोखमीच्या व्यक्तीवर महापालिका वैद्यकिय विभाग लक्ष ठेवून आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com