लंडनहून चार पर्यटक नाशकात दाखल; मनपाकडून सर्वजण चौदा दिवस हॉटेल क्वारंटाईन

jalgaon-digital
1 Min Read

लंडन, सिंगापूर, मनिलाहून आलेले प्रवासी क्वारंटाईन

नाशिक | प्रतिनिधी 

लंडनहून आलेले चार व सिंगापूरहून आलेले दोन असे एकूण सहा प्रवासी रविवारी (दि.10) नाशिकमध्ये आले. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यांना पुढील 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यात काही विद्यार्थी व व्यावसायिक यांचा समावेश आहे. दरम्यान रविवारी मध्यरात्री दोनजणांना मनिलाहून नाशिकमध्ये आणण्यात आले आहे.

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी युरोपसह पाश्चात्य देशांनी लॉकडाऊन केले आहे. भारतात देखील 22 मार्चपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे देशातील अनेकजण युरोप व इतर देशात अडकले होते. त्यामध्ये नाशिकमधील शिक्षण, नोकरी व व्यवसायानिमित्त गेलेल्यांचा समावेश होता. मागील दोन दिवसापासून केंद्र सरकार इतर देशात अडकलेल्या नागरिकांना विशेष विमानाने देशात आणले जात आहे.

शनिवारी (दि.9) मध्यरात्री लंडनमधील चार व सिंगापूरमधील दोन जण या विशेष विमानाने मुंबई विमानतळावर आले. तेथे त्यांची आरोग्य तपासणी झाली. करोना संशयित नसल्याने या सहा जणांना नाशिकमध्ये आणण्यात आले.

या ठिकाणी महापालिकेच्या डॉक्टरांनी त्यांची पुन्हा आरोग्य तपासणी केली. त्यानंतर या सहाजणांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले. रविवारी रात्री उशीरा मनिलाहून दोनजणांना नाशिकमध्ये आणण्यात आले. त्यांची देखील आरोग्य तपासणीकरुन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *