नाशिक शहरात आणखी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले; अंबड परिसरातील सर्व रुग्ण

नाशिक शहरात आणखी चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले; अंबड परिसरातील सर्व रुग्ण

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरवासियांसाठी वाईट बातमी आहे. आज आणखी चार रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. हे रुग्ण अंबड लिंक रोडवरील संजीवनगरमधील दोन दिवसांपूर्वी बाधित आढळून आलेल्या महिलेचे निकटवर्तीय असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.

नाशिकमधील आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. यामध्ये नाशिक शहरात ९  जिह्यातील चार तालुक्यांत तीन आणि मालेगावमध्ये एकूण ६२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये तिघांचा मालेगाव येथे मृत्यू झाला आहे. तर एक मृत्यू मालेगावातील तरुणीचा धुळे येथे झाला आहे.

आज मिळून आलेले रुग्ण हे अंबड लिंक रोडवरील संजीवनगर परिसरातील आहेत. याठिकाणी गेल्या तीन दिवसांपूर्वी वयोवृद्ध महिला कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर महिलेच्या कुटुंबियांना संस्थात्मक स्थानबद्ध करण्यात आले होते. यामध्ये दोन्ही मुलगे आणि सुनांचा  समावेश होता.

गेल्या काही दिवसांपूर्वी महिलेचे दोन्ही मुलगे हे मुंबई आणि पुण्यातून नाशिकमध्ये आले आहेत. यामध्ये एक मुंबईत पोलीस असल्याचे समजते तर दुसरा पुण्यात एका कंपनी असलायचे प्राथमिक वृत्त आहे.

आज सकाळी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील दुसरा कोरोना बाधित रुग्णाची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर इतर रुग्णांच्या जवळच्या संपर्कात आलेले नातलगांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे दिलासा मिळाला होता. तर आज सायंकाळी पुन्हा चार बाधित रुग्णांची भर पडल्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com