कराेना संकट घट्ट; नाशिक शहरात आज चाैघा बाधितांचा मृत्यू; नवे २८ रूग्ण ‘पाॅझिटिव्ह’
स्थानिक बातम्या

कराेना संकट घट्ट; नाशिक शहरात आज चाैघा बाधितांचा मृत्यू; नवे २८ रूग्ण ‘पाॅझिटिव्ह’

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी

शहरात कराेनाचे संकट घट्ट हाेताना दिसत आहे. राेजच नवे रूग्ण दाखल हाेत असल्याने नाशिक शहरवासियांच्या चिंतेत भर पडत असून शनिवारी दिवसभरात शहरातील एकूण २८ रूग्णांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे. तर चार करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे. बाधित आढळलेल्या रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया महानगरपालिकेच्या आराेग्य विभागाने सुरू केली आहे.

दरम्यान, लाॅकडाऊन शिथिल हाेत असताना राज्य शासनाच्या सूचनांनुसार मनपा प्रशासन ‘मिशन बिगिन अगेन’ राबवित आहे. त्यामुळे शहरातील एकूणच व्यवहार सुरळीत हाेत आहेत. त्यामुळे माेठ्या प्रमाणात नागरिक कामासाठी व खरेदीसाठी घराबाहेर पडत असून मुख्य बाजारपेठा गजबजायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे साेशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडत असून गर्दी वाढत असल्याने शहरातील कराेना रग्णांची संख्या वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

शनिवारी शहरातील ६० अहवालांपैकी २८ अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. यात गंगापूर राेड येथे एक रूग्ण, पंपिंग राेड १, पंडित काॅलनी १, दिंडाेरी नाका १, सरदार चाैक १, माडसांगवी १, सारडा सर्कल १, नाईकवाडी पुरा ३, पेठराेड २, पंडित नगर सिडकाे २, काेणार्क नगर १, माेठा राजवाडा ३, जुने सिडकाे १, देवळाली कॅम्प १, नागचाैक १, भवानी प्रसाद राे -हाऊस १, टाकळी राेड १, विधाते नगर, अशाेका मार्ग १, गुलमाेहाेर नगर, म्हसरूळ १, गंजमाळ १, सिन्नरफाटा १, राजेंद्र काॅम्प्लेक्स, नाशिकराेड १ असे २८ रूग्ण कराेनाबाधित आहेत.

एकाच दिवशी चार जणांचा मृत्यू

महापालिका रूग्णालयांत उपचार घेणाऱ्या शहरातील चार बाधितांचा शनिवारी मृत्यू झाला आहे. नाईकवाडी पुरा अजमेरी मस्जिद येथील ५० वर्षीय महिलेचा शनिवारी मृत्यू झाला असून पखाल राेडवरील अमन हाऊस मागील सुमन चंद्र बिल्डिंगलगत ४१ वर्षीय व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. तसेच गंजमाळ येथील ४४ वर्षीय व्यक्तीचा कराेनाने मृत्यू झाला आहे. खोडे नगर, वडाळा येथील ३८ वर्षीय व्यक्तीचेही कराेनाने निधन झाले आहे. आत्तापर्यंत मनपा हद्दीत १८ जणांचा कराेनाने बळी गेला आहे.

शहरात आत्तापर्यंत १३३ रुग्ण कराेनामुक्त झाले आहेत. तर मनपा हद्दीत १९ जणांचा कराेनाने मृत्यू झाला आहे. शनिवारी मनपाच्या रूग्णालयांत ८५ संशयित रूग्ण दाखल करण्यात आले. सध्या १०३ अहलाल प्रलंबित असून आजमितिस ३६६ कराेनाबाधित उपचार घेत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com