मालेगावात आणखी पाच करोना बाधित वाढले; रुग्णसंख्या पोहोचली २५८ वर
स्थानिक बातम्या

मालेगावात आणखी पाच करोना बाधित वाढले; रुग्णसंख्या पोहोचली २५८ वर

Dinesh Sonawane

मालेगाव | प्रतिनिधी

करोनाचा उद्रेक वाढत असल्याने शहरात संकट अधिक गडद झाले आहे. अवघ्या चोवीस तासात 87 संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या १८१ वरून २५८ वर जाऊन पोहोचली आहे.  करोना बाधितांची झपाट्याने वाढत असलेली संख्या चिंता व्यक्त करणारी असून संपूर्ण यंत्रणेचे लक्ष मालेगाववर लागून राहिले आहे.

या बाधितांमध्ये तीन महिन्याच्या बालकासह तीन, पाच, सात व अकरा वर्षीय बालकांचा असलेला समावेश शहरवासीयांना अस्वस्थ करणारा आहे.

या अहवालातच शहरात विविध पोलिस ठाण्यात बंदोबस्तासाठी तैनात असलेले १२ पोलिसांचे अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याने पोलीस यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्तावर तैनात पोलिस तसेच त्यांच्या कुटुंबियांची शिबिरा द्वारे तज्ञ डॉक्टरांचा तर्फे वैद्यकीय तपासणी करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे.

करोना बाधित पोलिसांना म्हालदे शिवारातील घरकुल योजनेत तयार घरांमध्ये उपचारार्थ ठेवण्यात आले आहे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ आरती सिंग अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी या बाधित पोलिसांची भेट घेत प्रकृतीची चौकशी केली.

तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या तुमच्या कुटुंबाची काळजी आम्ही घेऊ असा दिलासा देत अधिकाऱ्यांनी बाधित पोलिसांचे मनोबल वाढविले.

खुशामत पुरा संगमेश्वर आदी भागातून नव्याने बाधित रुग्ण आढळून आल्याने कंटेनमेंट क्षेत्रात अधिक वाढ होणार आहे. धुळे पाठोपाठ नाशिक येथील डॉ वैद्यकीय महाविद्यालयात स्त्राव नमुने तपासणीस वेग आल्यामुळे गत 24 तासात 341 अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये 254 निगेटिव तर 87 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहराचे अद्याप 412 स्त्राव नमुने तपासणी अहवाल प्रलंबित आहेत येत्या एक-दोन दिवसात ते प्राप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Deshdoot
www.deshdoot.com