Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकमधील मुख्य बाजार पेठा बंदच राहणार; पाचपेक्षा अधिक दुकाने असल्यास अत्यावश्यक सेवांनाच...

नाशिकमधील मुख्य बाजार पेठा बंदच राहणार; पाचपेक्षा अधिक दुकाने असल्यास अत्यावश्यक सेवांनाच परवानगी – सुरज मांढरे

नाशिक | प्रतिनिधी 

एका लेनमध्ये पाच पेक्षा अधिक दुकाने असतील तर तिथे फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु राहतील. एका लाईनमध्ये पाच पेक्षा अत्यावश्यक दुकाने असू शकत नाहीत. तसेच मोठी लाईन असेल तर अत्यावश्यक सेवा नसलेली दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. ते एका मुलाखतीत बोलत होते.

- Advertisement -

रेड झोनमध्ये दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. हा वेळ सकाळी सात ते रात्री सात पर्यन असायला पाहिजे असे बंधन असेल. यामध्ये दुकानदाराने दुकान सकाळी केव्हाही उघडले तरी ते रात्री सात नंतर बंदच करावे लागेल असे मांढरे म्हणाले.

शहरात शिथिलता दिल्यामुळे काही प्रमाणात गर्दी वाढण्याची शक्यता आहे. यादरम्यान, दुचाकीने केवळ एका व्यक्तीला प्रवास करता येणार आहे तर चारचाकी वाहनामध्ये एक चालक आणि इतर दोघे मागच्या आसनावर बसून प्रवास करू शकणार आहेत.

नाशिक शहरात संपूर्ण रेड झोन आहे. त्यामुळे येथील व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही अगर याठिकाणी बाहेरील कोन्ही व्यक्ती येऊ शकत नाही. धुणे भांडे करण्यासाठी घरी कुणी येत नाहीयेत यासाठी काय सवलत आहे. याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले की प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी संपूर्ण काळजीने महिलांना कामावर बोलविता येणार आहे.

जिल्ह्यातील नऊ तालुके ऑरेंज झोनमध्ये आहेत.  याठिकाणी शिथिलत मिळणार आहे.  इतर तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहेच. वेग्व्वेगले झोन जाहीर करण्यात आले आहेत. कुठे काय मोकळीक देण्यात आली आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र जवळपास ७५ आहेत याठिकाणी अतिदक्षता घेतली जाणार आहे. याहिकाणी फैलाव होण्याची शक्यता अधिक आहे. याठिकाणी अधिसारख्या निकष जारी राहणार आहेत. यामध्ये १० ते ४ अत्यावश्यक सेवा आणि इतर दुध वगैरेबाबतच्या सेवा ठरवून दिलेल्या वेळेत सुरु राहणार आहे.

रेड झोनमध्ये जीवनावश्यक सेवा, एका लाईनमध्ये पाचपेक्षा अधिक दुकाने सुरु होणार नाहीत. मद्य दुकानांना निकष ठेवून परवानगी दिली जाणार आहे. केवळ एकल दुकाने सुरु होतील. स्वतःच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदरी दुकानदारांनी घ्यावयाची आहे. अर्थव्यवस्था आणि आजार यामध्ये समतोल राखला जात आहे त्यामुळे काही शिथिलता देण्यात आली आहे.

ऑरेंज झोन मध्ये नागरिक ये जा करू शकतात बाहेर जाऊ शकतात. त्यामुळे याठिकाणी इतर झोनपेक्षा अधिक सवलत असली तरी काळजी घेणे गरजेचे आहे.

हे बंदच राहणार आहे

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून सराफा, कपडे, सलून व इतर दुकाने बंदच राहतील. शाॅपिंग माॅल बंदच राहणार आहेत. दुकानाबाहेर पाच ग्राहक नसावे. सोशल डिस्टनचे पालन करावे असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या