File Photo
File Photo
स्थानिक बातम्या

माजी खासदार देविदास पिंगळे यांना दिलासा; अपसंपदा प्रकरणाची फाईल बंद

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

अपसंपदा गोळा केल्याप्रकरणी माजी खासदार देविदास पिंगळे यांची फाईल एसीबीकडून बंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे माजी खासदार पिंगळे यांना दिलासा मिळाला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी माजी खासदार पिंगळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जात आहे.

याच वेळी विविध मार्गांनी माजी खासदार पिंगळे यांनी अपसंपदा जमविली असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येत होती.

दरम्यान, ही फाईल बंद करण्यात आली असल्याची माहिती सुत्रानी दिली. एका प्रकरणातून माजी खासदार यांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल असल्याने कारवाईची टांगती तलवार कायम आहे.

Deshdoot
www.deshdoot.com