मालेगावमध्ये चार नवे करोनाबाधित आढळले; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५११ वर

मालेगावमध्ये चार नवे करोनाबाधित आढळले; जिल्ह्यातील रुग्णसंख्या ५११ वर

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांच्या संख्येत आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आज दुपारी आलेल्या दोन वेगवेगळ्या अहवालात करोनाचे ८ रुग्ण वाढले आहेत. अहवालात मालेगावमधील चार तर जिल्ह्यातील चार अशा रुग्णांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढून ५११ वर पोहोचली आहे. यामध्ये मालेगाव शहरात चार, येवल्यातील एक, सिन्नर मधील एक आणि नाशिक शहरातील टाकळी परिसरातील समता नगर येथील आहेत.

आज सकाळी दोन वेगवेगळे अहवाल प्रशासनाकडून प्राप्त झाले यामध्ये मालेगावमधील चार आणि नाशिक जिल्ह्यात चार करोना रुग्णांचा समावेश आहे. मालेगावात आज आढळून आलेले रुग्ण सिद्धार्थ नगर, गुलशेरनगर, नुमानी नगर, परिसरातील आहेत.

मालेगावात आज एकूण ५० अहवाल प्राप्त झाले यामध्ये ०४ बाधित रुग्ण आढळून आले तर तीन मागील बाधित रुग्णांची चाचणी पुन्हा एकदा बाधित आढळून आली आहे. तर आजच्या अहवालात एकूण ४३ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. मालेगावात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे मालेगावचा आकडा वाढून ४१७ वर पोहोचला आहे.

समतानगरमधील रुग्णाचा पत्ता समजेना

मनपा प्रशासनाला टाकळी रोड वरील समता नगरमधील रुग्णाचा अद्याप पत्ता मिळालेला नाही. हा रुग्णाचा मालेगावरोडवर अपघात झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या रुग्णामध्ये करोनाचे लक्षणे आढळून आल्याने त्याचे घशातील स्राव तपासणीला पाठवले होते. आज या रुग्णाचा अहवाल बाधित आढळून आला आहे. समता नगर पत्ता सांगितल्याने पत्ता शोधणे अवघड झाले आहे. तरीदेखील नागरिकांनी घाबरण्याचे काही एक कारण नाही पण खबरदारी व काळजी घेणे गरजेचे असल्याचे मनपा प्रशासनाने म्हटले आहे.

नाशिक जिल्ह्यातील एकूण करोना बाधित

नाशिक ग्रामीण

एकूण रुग्ण ५६
पूर्णपणे बरे ०२
मृत्यू ००
प्रलंबित अहवाल ६४

नाशिक मनपा

एकूण रुग्ण २१
पूर्णपणे बरे ०३
मृत्यू ०१
प्रलंबित अहवाल ३८

मालेगाव मनपा

एकूण रुग्ण ४१७
पूर्णपणे बरे २८
मृत्यू १४
प्रलंबित अहवाल ६९७

जिल्हा बाहेरील रुग्ण
एकूण रुग्ण १६
पूर्णपणे बरे ००
मृत्यू ००
प्रलंबित अहवाल ०६

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com