नाशिक शहरात पाच करोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या पोहोचली १८३ वर, मनमाड, इगतपुरीतही आढळले रुग्ण
स्थानिक बातम्या

नाशिक शहरात पाच करोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या पोहोचली १८३ वर, मनमाड, इगतपुरीतही आढळले रुग्ण

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरात आज नव्याने पाच रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सातपूर येथील पतीपत्नी चा अहवाल बाधित आढळून आला आहे. आजच्या वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे नाशिक शहरातील करोनाबाधितांचा आकडा १८३ वर पोहोचला आहे. शहरात आतापर्यंत ५० रुग्ण करोनामुक्त झाले आहे तर १२५ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर शहरात आतापर्यंत ८ रुग्णांचा करोना संसर्गाने  मृत्यू झाला आहे. वाढलेल्या रुग्णांमुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या  ३४ वर पोहोचली आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णांची अशी आहे हिस्ट्री 

सातपूर परिसरातील वृंदावन नगर गार्डन परिसरातील ४३ वर्षीय व्यक्ती व त्याची ३७ वर्षीय पत्नी या दोघांना घसा, दुखणे आदी त्रास होत असल्याने खाजगी रुग्णालयात दिनांक २८ मे २०२० रोजी दाखल झाले होते. त्यांच्या घश्याचे स्वब घेतले असता दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत.

मखमलाबाद रोड येथील सायली निवास, राधानगर,ड्रीम कॅस्टल परिसरातील २० वर्षीय युवकाला सर्दी-पडशाचा त्रास होत असल्याने त्याचे स्वब घेण्यात आले होते. ते कोरोना बाधित असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्याच्यावर तपोवन येथील कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत.

रिलायन्स पेट्रोल पंप दिंडोरी रोड समोरील प्रयाग ग्रीन सोसायटी येथील २९ वर्षीय रहिवासी हे जळगावहुन प्रवास करून नाशिकला आले त्यांना ताप व सर्दी असल्याने तपासणी केली असता त्यांचे स्वब घेण्यात आले त्यांचा अहवाल कोरोना बाधीत आला आहे.

चरण पादुका रस्ता, पंचवटी,२८ वर्षीय तरुण ताप, खोकल्याच्या तक्रार असल्याने त्याचे स्वब घेण्यात आले ते पॉझिटिव्ह आले आहेत. या युवकाचे वडील ग्रामीण पोलीस विभागात कार्यरत असून त्यांचे स्वब  मात्र  निगेटिव्ह आले असल्आयाने दिलासा मिळाला आहे.

यासोबतच आज सायंकाळी आणखी तीन अहवाल बाधित आढळून आले आहेत. यामध्ये इगतपुरी येथील आश्रम राजुल येथील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे. तर मुंबईतील भांडूप येथील एक रुग्ण बाधित असून नाशिकमध्ये या रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर मनमाड येथील शाकुंतल नगरपरिसरातील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com