घराची चावी कुणाकडे देण्याआधी सावधान; नाशकात भावजयीने केली ननंदेची फसवणूक
स्थानिक बातम्या

घराची चावी कुणाकडे देण्याआधी सावधान; नाशकात भावजयीने केली ननंदेची फसवणूक

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

परगावी जातांना नंनंदेने भावजयीकडे घराची चावी व कपाटाची चावी दिली असता, भावजयीने नवर्‍याच्या मदतीने ननंदेच्या घरातील दागिने व रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल लंपास करून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.

स्नेहा भटू कांकरिया (रा. अभिषेक विहार, गुलमोहोर नगर, म्हसरूळ) यांच्या फिर्यादीनुसार, त्या जोधपुर येथील मुळ गावी जाण्यासाठी निघाल्या असता, त्यांनी घराची, कपाटाची चावी, वाहन व पर्स सुरक्षित ठेवण्यासाठी भावजयी संशयित दिपाली रामदास वैष्णव (रा. दत्तनगर, पाटाजवळ , पेठरोड, पंचवटी) हिच्याकडे विश्वासाने दिले.

मात्र, स्नेहा यांचा भाऊ व संशयित रामदास वैष्णव याने पत्नी दिपालीच्या मदतीने दि. 27 नोव्हेंबर 2019 ते 15 जानेवारी 2020 या कालावधित कांकरिया यांच्या घराचे कुलूप घोलून त्यातील सोन्याचांदीचे दागिने व एमएम 04 बीडब्ल्यू 2232 या क्रमांकाचे डॅटसन वाहन व कागदपत्रे ठेवलेली पर्स असा एक लाख 75 हजार रूपयांच्या ऐवजाचा अपहार करून फसवणूक केली.

याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात दम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक निरीक्षक भडीकर करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com