आंबेदिंडोरी येथील रुग्णाच्या संपर्कातील चौघे निगेटिव्ह
स्थानिक बातम्या

आंबेदिंडोरी येथील रुग्णाच्या संपर्कातील चौघे निगेटिव्ह

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

आंबेदिंडोरी | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी येथे रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. मात्र,  या रुग्णाच्या संपर्कातील चारही रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे मोठा दिलासा मिला आहे. या चौघांमध्ये करोनाबाधित रुग्णाचे पत्नी मुलगा तसेच दोन कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

आंबेदिंडोरी येथील एका ६० वर्षीय व्यक्तीचा अपघात झाला होता. त्यानंतर या अपघातग्रस्त व्यक्तीला नाशिक येथील सिंफनी हाँस्पिटल मध्ये तपासणीसाठी भरती करण्यात आले होते. या रुग्णाचा एक्सरे काढून फ्रँक्चर असल्याचे निदान झाले. दरम्यान, त्यांचा घशाचा स्वँब नमुनेदेखील  घेण्यात आला होता. या अहवालात ही व्यक्ती पाँझिटिव्ह आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात होती.

यानंतर घरातील सर्व व्यक्तींना व गावातील ३ कर्मचाऱ्यांचाही त्यांच्याशी संबंध आल्याने त्यांनाही १४ दिवस करोना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले होते.

आज या रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे मोठा दिलासा दिंडोरीकरांना मिळाला आहे. आंबेदिंडोरी गावात १४ दिवस सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येणार आहे व रुग्णाच्या घरचा परिसर ग्रामपंचायतीने लगेचच निरजंतूकिकरण करण्यात आला होता. या रुग्णाला रुग्णालयातच करोनाची बाधा झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजित कोशिरे यांनी दिली.

तर तालुका पातळीवर  प्रांत अधिकारी संदिप आहेर,तहसीलदार कैलास पवार, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार हे वेळोवेळी रुग्णांची माहिती घेत आहे. व गाव पातळीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून तलाठी विजय कातकाडे ग्रामसेवक रविंद्र माघाडे, प्रशासकीय अधिकारी पी.व्हि परदेशी,आरोग्य सेवक प्रविण पाटिल, आरोग्य सेविका सुनंदा पवार सी.एच.ओ.डॉ.शुभांगी गाडे, आशा कामगार व अंगणवाडी सेविका,मदतनीस हे वेळोवेळी गावातील आरोग्याची तपासणी करीत आहे. तर शिक्षक वर्ग तपासणी नाक्यावर कर्तव्य बजावत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com