दिलासादायक : देवळा तालुक्यातील सहा संशयित रुग्णाचे अहवाल ‘निगेटिव्ह’
स्थानिक बातम्या

दिलासादायक : देवळा तालुक्यातील सहा संशयित रुग्णाचे अहवाल ‘निगेटिव्ह’

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

देवळा | तालुक्यातील  दहिवड येथील करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील ६ संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे मोठा दिलासा देवळावासियांना मिळाला आहे. आज सकाळी याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.

तालुक्यातील दहिवड येथील एका संशयित रुग्णाचा शुक्रवारी (दि. २९) रात्री करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्या रुग्णाच्या संपर्कातील पाच व्यक्तींच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात येऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्यापैकी चार व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले होते तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यानंतर बाधित रुग्णाच्या हाय रिस्क संपर्कातील व्यक्तींना स्थानबद्ध करून त्यांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते.

दरम्कायान, आज या  नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्सये हा संशयित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे तालुक्यातील जनतेने सुटकेच्या निश्वास सोडला आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा, स्वच्छता राखावी असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com