उमराणे : नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ
स्थानिक बातम्या

उमराणे : नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक | वार्ताहर

देवळा तालुक्यातील उमराणे येथील मुंबई-आग्रा महामार्गावर ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात इसमाचा नग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांनी सूत्रे फिरवली आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दिनांक २ रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास गिरणारे येथील पोलीस पाटील अनिल देवा वाघ यांनी देवळा पोलिसात उमराणे शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावरील पवन शिवाजी देवरे यांच्या शेतालगत ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात इसमाचा नग्न अवस्थेतील मृतदेह पडून असल्याची खबर दिली.

यावेळी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सदर मृतदेहाजवळ कुठलेही ओळखीचा पुरावा न मिळाल्याने मृतदेह उत्तरीय तपासासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दरम्यान, घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. सदर घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.

Deshdoot
www.deshdoot.com