Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकदेवळाली कॅम्प : नानेगाव परिसरात पतीकडून पत्नीची हत्या; गुन्हा दाखल

देवळाली कॅम्प : नानेगाव परिसरात पतीकडून पत्नीची हत्या; गुन्हा दाखल

देवळाली कॅम्प | वार्ताहर

देवळाली कॅम्प परिसरातील नानेगाव परिसरात पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल (दि. २६) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, येथील नानेगाव येथील जयभवानीनगर  देवळाली कँम्पमधील नाणेगाव येथे घडली.  पती हिरामण निवृत्ती बेंडकुळे  (वय ३०) याचे पत्नी काजल हिरामण बेंडकुळे (वय 26) हिच्यासोबत भांडण झाले.

भांडणातून राग अनावर झाल्याने पतीने लाकडी दांडका असलेल्या फावड्याने पत्नीला मारहाण केली. यात पत्नीच्या डोक्याला वर्मी घाव बसल्याने पत्नीचा मृत्यू झाला. याप्रकरणी संदीप अर्जुन रोकडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या