Thursday, April 25, 2024
Homeनाशिककुऱ्हाडीने महिलेची निर्घुण हत्या; देवळा तालुक्यातील देवपुरपाड्यातील घटना

कुऱ्हाडीने महिलेची निर्घुण हत्या; देवळा तालुक्यातील देवपुरपाड्यातील घटना

वासोळ | वार्ताहर

देवळा तालुक्यातील देवपुरपाडे येथे चोरी करण्याच्या हेतूने महिलेचा खून झाल्याची घटना आज (दि.११) रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, देवपुरपाडे येथील चिंचमळा शिवारात राहणाऱ्या शेतकरी विजय छबू जोंधळे यांच्या शेजारी राहणाऱ्या संशयित अंकलेश अरुण गांगुर्डे (वय १९) यांने आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास जोंधळे यांचे घर गाठून चोरी करण्याच्या हेतूने जोंधळे यांच्या पत्नी जिजाबाई विजय जोंधळे (वय:५०) यांच्यावर धारधार कुऱ्हाडीने हल्ला चढवला.

या हल्ल्यात जिजाबाई या महिलेचा जागीच मृत्यू झाला. संशयिताने महिलेच्या मुलाला संदीप विजय जोंधळे ( वय २७) व सून राणी संदीप जोंधळे (वय २४) यांच्यावरही हल्ला केला.

संदीप यांच्या डोक्यात व हातापायावर आरोपीने वार केल्याने संदीप हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मालेगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.

सदर घटनेची माहिती देवळा पोलिसांना समजताच देवळा पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आरोपी अंकलेश गांगुर्डे याला अटक करण्यात आली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलिस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या