दिलासा : नाशिक शहरात अति जोखमीच्या व्यक्ती घटल्या
स्थानिक बातम्या

दिलासा : नाशिक शहरात अति जोखमीच्या व्यक्ती घटल्या

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

शहरात 6 एप्रिल रोजी पहिला करोना बाधीत व्यक्ती सापडल्यानंतर आज 45 दिवसांंनंतर रुग्णांची संख्या 49 झाली असुन यामुळेच शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या 35 पर्यत गेली होती. दरम्यान, या रुग्णांपैकी 37 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहे. 35 प्रतिबंधीत क्षेत्रापैकी 13 प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्वच निर्बंध हटविण्यात आले आहे. परिणामी या एकुण प्रतिबंधीत क्षेत्रातील बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेले एकुण 612 अतिजोखमी व्यक्ती आता कमी होऊन 369 झाला आहे. तर कमी जोखमीच्या व्यक्ती 1000 वरुन 321 इतक्या झाल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बुधवार (दि.19) दुपारपर्यत नाशिक जिल्ह्यात करोना रुग्णांना आकडा 863 पर्यत गेला असुन आत्तापर्यत 42 जणांना मृत्यु झाला आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात बाधीतांचा आकडा 49 पर्यत गेले असुन याठिकाणाहुन 37 बरे होऊन घरी गेले असुन आता केवळ 13 जणांवर उपचार सुरु आहेे. तर नाशिक ग्रामीण जिल्ह्यात 104 बाधीत आढळून आले असुन यातील 62 जण बरे झाले आहे.

तसेच मालेगांव महापालिका क्षेत्रात सोमवारपर्यत 673 करोनाचे रुग्ण आढळून आले असुन 40 जणांचा मृत्यु झाला आहे. तसेच परराज्य व परजिल्ह्यातील 30 जण बाधीत आढळून आले असुन यापैकी दोन जणांवर उपचार सुरु आहे. मंगळवारी (दि.19) शहरातील विविध भागातून 29 संशयित उपचारासाठी दाखल झाले असुन आता महापालिका क्षेत्रातील उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या 95 वरुन कमी होऊन 83 इतकी झाली आहे.

शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या 35 वरुन 22 इतकी झाली असुन अजुन काही प्रतिबंधीत क्षेत्रातील निर्बंध हटविण्याची शक्यता आहे. आजपर्यत 13 प्रतिबंधीत क्षेत्रातील अति जोखमी व्यक्तींची व कमी जोखमीचा आकडा कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या 1559 झाली असुन यातील 815 जणांचा देखरेखीखालील 14 दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात 1403 संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर 1400 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. 6 एप्रिल पासुन आज (दि.20) पर्यत उपचार होऊन महापालिका क्षेत्रातील 48 आणि खाजगी 2 असे एकुण 49 करोना बाधीत आढळले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com