आरोग्य विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ आज; राज्यपाल कोशियारी यांची प्रमुख उपस्थिती
स्थानिक बातम्या

आरोग्य विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ आज; राज्यपाल कोशियारी यांची प्रमुख उपस्थिती

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा एकोणीसावा दीक्षान्त समारंभ मंगळवारी (दि.21) विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल भगतसिंंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. पेठरोडवरील विद्यापीठ आवारातील शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनी येथे सकाळी 11 वाजता हा समारंभ होणार आहे.

या समारंभास विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे व ैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य खात्याचे मंत्री अमित देशमुुख, जिल्हयाचे पालकमंत्री तथा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री छगन भुजबळ, कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर आदी उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले की, याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 62 सुवर्णपदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. याच बरोबर संशोधन पूर्ण केलेल्या 14 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभासाठी शैक्षणिक वर्ष 2018-2019 मध्ये घेतलेल्या पदवीका, पदवी,पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केल ेल्या आरोग्य शाखांच्या एकूण 11409 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दीक्षान्त समारंभाची सुरूवात विद्वजन मिरवणुकीने होणार आहे. या मिरवणूकीत प्रमुख अतिथी, अधिसभा, व्यवस्थापन परिषद आणि विद्या परिषदेचे सदस्य सहभागी होणार आहेत.

दीक्षान्त समांरभात आरोग्य विज्ञान पदवी आणि पदव्युत्तरच्या विविध विद्याशाखांतील अंतिम वर्षाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, विविध विषयांमध्ये नैपुण्य प्राप्त केलेल्यांना सुवर्णपदके प्रदान केली जाणार असून व ैद्यकीय विद्याशाखेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीण विद्यार्थ्यांस मेरीट स्कॉलरशिप अ‍ॅवॉर्ड रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

14 पीएचडी धारक

या पदवीदान समारंभात वैद्यक विद्याशाखेचे डॉ. संदीप वाळुंजकर, डॉ. सुनिता रामानंद, डॉ. सुरेखा तायडे, डॉ. सुमित तिवारी, डॉ. संदीपन मुखर्जी, डॉ. अतुल खजुरिया, डॉ. वैषाली वाबळे, डॉ. बाहुबली नगनकर यांना तर आयुर्वेद व युनानी विद्याषाखेचे वैद्य संतोष साळवी, वैद्य राजेष शहा, वैद्य सुचेता कुमारी, वैद्य गुलाबराव गावने यांना तसेच होमिओपॅथी विद्याषाखेचे डॉ. आन ंदराव गिते, डॉ. सचिन भोसले यांना पीएच. डी. ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

असे पदवी प्रदान

पदवी:  आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवी 474, दंत विद्याशाखा पदवीे 104, आयुर्वेद विद्याशाखा 856, युनानी विद्याशाखा 91, होमिओपॅथी विद्याशाखा 811, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखा 336, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखा 1977, बी.पी.टी.एच. विद्याशाखा 108 बी.ओ.टी.एच. विद्याशाखा 19, बी.ए. एस.एल.पी. विद्याशाखा 31, बी.पी.ओ. विद्याशाखा 06, डिप्लोमा इन ऑप्थॅल्मिक सायन्स विद्याशाखा 04, डिप्लोमा इन ऑप्टोमेटीं विद्याशाखेा 03,

पदव्युत्तर : एम.डी.म ेडिकल विद्याशाखेचे 882, एम.एस.मेडिकल विद्याशाखेचे 466, डी.एम.मेडिकल विद्याशाखेचे 377, एम.सी.एच. मेडिकल विद्याशाखेचे 59, पी.जी.डिप्लोमा विद्याशाखेचे 436, पॅरामेडिकल डिप्लोमा विद्याशाखेचे 114, पी.जी.डी.एम.एल.टी. विद्याशाखेचे . 110, एम.बी.ए. 14 हेल्थ केअर अ‍ॅडमिनिस्टेंशन 1251, एम.डी.एस.विद्याशाखेचे 388, एम.डी.आयुर्वेद , विद्याशाखेचे 46, एम.एस.आयुर्वेद विद्याशाखेचे 23, एम.एस्सी.नर्सिंग विद्याशाखेचे 139, एम. डी. होमिओपॅथी विद्याशाखेचे 68, एम.पी.एच. 14न्य ुटींषन 1208 तसेच 62 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व एक विद्यार्थ्यांस रोख पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.

Deshdoot
www.deshdoot.com