Photo Gallery : नासिक्लब पुष्प प्रदर्शनाला हजारो नाशिककरांची हजेरी
स्थानिक बातम्या

Photo Gallery : नासिक्लब पुष्प प्रदर्शनाला हजारो नाशिककरांची हजेरी

Dinesh Sonawane

नाशिक | प्रतिनिधी 

देशभरातून विविध रंगबिरंगी व विविध प्रकारातील गुलाब पुष्पांचे प्रदर्शन गेल्या तीन दिवसांपासून नासिक्ल्ब येथे सुरु होते. गेल्या तीन दिवसांत इथे हजारो नाशिककरांनी भेट देत विविधरंगी फुलांचा सुगंध घेतला. आज या पुष्पप्रदर्शनाचा समारोप करण्यात आला.

शहरातील विविध शाळा आणि संस्थांच्या सहलीदेखील याठिकाणी पुष्पप्रदर्शनाचा आनंद लुटण्यासाठी याठिकाणी आल्या होत्या. या ठिकाणी जवळपास ८५० पेक्षा अधिक फुलझाडे ठेवण्यात आली होती. विविध प्रकारच्या गुलाबाचे जवळपास बाराशे पेक्षा अधिक कुंड्या ठेऊन सजविण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी हा फुलांचा मेळा आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी याठिकाणी गर्दी केली होती.

फुलांबरोबरच पुष्प प्रेमी नाशिककर गुलाबपुष्पाने सजवलेल्या “रोज डॉल”, पुष्पाने सजवलेली मलेशियन पोपटांची जोडी व कल्पकतेने बनवलेल्या क्रिसमस ट्री या बरोबर देखील सेल्फीचा आनंद घेतला.

या गुलाब पुष्प महोत्सवाचा आज समारोप झाला. यावर्षी वैशिष्ट्य म्हणजे नाशिक तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी देखील गुलाब प्रदर्शनात भेट देऊन शेती संबंधी काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. यातून शेतकऱ्यांचा कल नवीन पारंपारिक शेती पासून काही नवीन करण्याकडे आहे हे जाणवले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com