संजीव नगर येथील कोरोणा रुग्णासह शिकाऊ डॉक्टर वर गुन्हा दाखल

संजीव नगर येथील कोरोणा रुग्णासह शिकाऊ डॉक्टर वर गुन्हा दाखल

नवीन नाशिक | प्रतिनिधी

कोरोना आजाराची लक्षणे असताना ही याची माहिती लपविल्याबद्दल पोलिसांनी संजीव नगर येथील २ कोरोणा रुग्णांसह शिकाऊ डॉक्टर वर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, अंबड येथील संजीव नगर भागात एका वृद्ध महिलेला गेल्या काही दिवसापूर्वी कोरोणाची लागण झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला होता.

त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अजून एकाला कोरोनाची लागण झाली. तर यापूर्वी त्या महिलेवर परिसरातील एका शिकाऊ डॉक्टरने उपचार केले होते.

यावेळी कोरोनाची लक्षणे असतानाही शासकीय रुग्णालयात दाखल न करता स्वतः उपचार केले. याप्रकरणी मनपाच्या डॉ. बस्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड येथील २ कोरोणा रुग्णासह शिकाऊ डॉक्टर वर कोरोणा रोगाच्या आजाराचा प्रसार केल्याप्रकरणी भा.द.वि कलम २६९, २७० प्रमाणे अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त मंगलसिंग सुर्यवंशी यांच्या आदेशानुसार वपोनी कुमार चौधरी करीत आहेत.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com